कंधार तालुक्यातील ८ गावांतील प्रलंबित रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:12 AM2020-12-07T04:12:26+5:302020-12-07T04:12:26+5:30

मरणानंतर रस्त्याअभावी होणारी हेळसांड थांबली कंधार : तालुक्यातील बारूळ येथील मातंग व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला ...

Pending roads in 8 villages of Kandhar taluka | कंधार तालुक्यातील ८ गावांतील प्रलंबित रस्ते

कंधार तालुक्यातील ८ गावांतील प्रलंबित रस्ते

googlenewsNext

मरणानंतर रस्त्याअभावी होणारी हेळसांड थांबली

कंधार : तालुक्यातील बारूळ येथील मातंग व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता. १ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या समाजाची प्रेत घेऊन जाताना होणारी हेळसांड थांबली आहे. तसेच इतर ७ गावांतील रस्ता व पाणंद रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात तहसील कार्यालयाला यश आले आहे.

तालुक्यातील अनेक गावांत लहानशी कारणे, स्थानिक राजकारण, हेवेदावे, काहीची अडवणुकीची असलेली भूमिका, भाऊबंदकीत असलेली टोकाची भूमिका आदींनी रस्त्याचा प्रश्न गुंतागुंतीचा होत असतो. गावात हा प्रश्न मिटत नसतो. काही जण न्यायालयात प्रकरण दाखल करतात. त्यामुळे सामान्य जणांची मोठी अडचण होते. माणुसकी व संवेदनशीलता असलेले अधिकारी व माणसे यातून सामोपचाराने मार्ग काढतात. तसेच तहसीलदार यांना असलेल्या अधिकाराचा उपयोग करून दिलासा दिला जातो. त्यामुळे प्रलंबित रस्त्याचे प्रश्न निकाली काढले.

बारूळ येथील बौद्ध व मातंग समाजाला स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याची मोठी समस्या होती.

मामलेदार १९०५ च्या पोटकलम ५ नुसार रस्त्याचा प्रश्न तहसीलदार यांनी सोडवत दोन्ही समाजाला मोठा दिलासा दिला. पावसाळ्यात मृत व्यक्तीवर करायचे अंत्यसंस्कार जोखमेचे होते. ऑक्टोबर २०२० मध्ये जटिल प्रश्न सुटला. तसेच याच गावातील एक पारंपरिक सुमारे १९६० पासूनचा पाणंद रस्त्याचा प्रश्न नोव्हेंबरमध्ये सुटला. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

उस्माननगर येथील २ रस्त्यांचे प्रश्न होते. तो प्रश्न नोव्हेंबर २०२० मध्ये सोडविण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला. दहीकळंबा येथील सुमारे १० कि.मी.पेक्षा जास्त असे ४ ते ५ रस्त्यांचे प्रश्न होते. मंत्री स्तरावर प्रश्न गेल्याचे समजते. हा प्रश्न सप्टेंबर २०२० मध्ये सोडविण्यात आला. पानभोसी येथील ४०० ते ५०० मीटरचा रस्ता प्रश्न सोडविल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पानशेवडी येथील दीड ते दोन कि.मी.चा रस्ता नोव्हेंबर २०२० मध्ये रस्ता प्रश्न सुटला. त्यामुळे नागरिक, पशुधनाला दिलासा मिळाला.

कारतळा येथील १९७२ पासूनचा पाणंद रस्ता तयार करण्यात आला. रस्ता अडचणीमुळे शेतकरी, शेतमजूर, पशुधनाची होणारी फरपट थांबली. २ कि.मी.चा हा रस्ता पालकमंत्री पाणंद रस्त्यात मंजुरी आणून १ लाखातून करण्यात आला. सोमठाणा येथील रस्ता वादाने अडचण येत होती. हा प्रश्न सोडवून पालकमंत्री पाणंद रस्त्याचा प्रस्ताव दाखल करण्याची सूचना करण्यात आली. तसेच गुटेवाडी ते जयराम तांडा हा २ कि.मी.चा रस्ता पालकमंत्री पाणंद रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूचना उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार व काही काळ प्रभारी तहसीलदार असलेले विजय चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या सहकार्याने, स्थानिक लोकप्रतिनिधी व विशेषतः नागरिकांच्या विधायक भूमिकेने रस्ते प्रश्न ३ महिन्यांत सुटण्यास मदत मिळाली.

Web Title: Pending roads in 8 villages of Kandhar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.