५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:19 AM2021-02-11T04:19:39+5:302021-02-11T04:19:39+5:30

यानिमित्त झालेल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना कर्नल जी.आर.के. सेशासाई यांनी मनोगत व्यक्त केले. नवी दिल्ली येथे होणाऱ्या या पथसंचलनमध्ये सहभागी ...

Performance of 52 Maharashtra Battalion NCC Nanded | ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडची कामगिरी

५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडची कामगिरी

googlenewsNext

यानिमित्त झालेल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना कर्नल जी.आर.के. सेशासाई यांनी मनोगत व्यक्त केले. नवी दिल्ली येथे होणाऱ्या या पथसंचलनमध्ये सहभागी होण्यासाठी अत्यंत खडतर प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. सहजासहजी यामध्ये यश मिळत नाही. परंतु ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जी.आर.के. सेशासाई आणि सुभेदार मेजर विक्रम सिंग (ऑनररी लेफ्टनंट) यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून अत्यंत कडक शिस्तीमध्ये या संचलनाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त होऊन मनदीप सिंग हा कॅडेट नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनमध्ये निवड होऊन सहभागी झाला. २,५०० विद्यार्थ्यांमधून मनदीप सिंग हा एकमेव कॅडेट मराठवाडा विभागामधून निवडल्या गेला.

बटालियनच्या इतिहासामध्ये ही कामगिरी गौरवास्पद असल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला नांदेड शहरातील यशवंत महाविद्यालय, पीपल्स महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय येथील एनसीसी कॅडेट व बटालियनचा पूर्ण स्टाफ उपस्थित होता.

Web Title: Performance of 52 Maharashtra Battalion NCC Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.