बिबट्या अन् दुचाकीस्वाराची भागम्भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:11 AM2018-05-06T01:11:47+5:302018-05-06T01:11:47+5:30

दुचाकीची चाहूल लागल्यावर बिबट्या पळायला लागला़ तर दुसरीकडे बिबट्या आपलाच पाठलाग करतो असा समज झाल्याने दुचाकीस्वार वाहन सोडून गावाकडे आरडाओरड करीत आला़ यामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र आले. घटनास्थळाकडे लाठ्या-काठ्या घेऊन ट्रॅक्टर, दुचाकी घेऊन १०० ते १५० जणांचा जमाव चालून गेला.

Picnic | बिबट्या अन् दुचाकीस्वाराची भागम्भाग

बिबट्या अन् दुचाकीस्वाराची भागम्भाग

Next
ठळक मुद्देदोघेही घाबरले एकमेकांना : उंचेगाव बु. शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
निवघा बाजार: दुचाकीची चाहूल लागल्यावर बिबट्या पळायला लागला़ तर दुसरीकडे बिबट्या आपलाच पाठलाग करतो असा समज झाल्याने दुचाकीस्वार वाहन सोडून गावाकडे आरडाओरड करीत आला़ यामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र आले. घटनास्थळाकडे लाठ्या-काठ्या घेऊन ट्रॅक्टर, दुचाकी घेऊन १०० ते १५० जणांचा जमाव चालून गेला.
मागील पाच दिवसांपूर्वी उंचेगाव बु़ येथील शेतकरी बैलांना चारा-पाणी करावयास गेला होता़ तेव्हा त्यास आंब्याच्या झाडाखाली बिबट्या दिसला होता़ असाच प्रकार ४ मे रोजी उंचेगाव बु़ येथे रात्री १०़३० वाजता घडला़ उंचेगाव बु़ येथील एका शेतात जेसीबीचे काम सुरू असताना डिझेल संपल्याने जेसीबीचालक दुचाकी घेऊन शेंबाळ पिंप्री येथे डिझेल आणावयास गेले. येताना रात्रीचे १०़३० वाजले होते़ त्यांना एका शेतात बिबट्या दिसला तर दुचाकीची चाहूल लागल्यावर बिबट्या पळायला लागला़ दुसरीकडे बिबट्या आपलाच पाठलाग करतो, असा समज झाल्याने दुचाकीस्वार दुचाकी सोडून गावाकडे आरडाओरड करीत आल्याने सर्व ग्रामस्थ एकत्र आले अन् घटनास्थळाकडे लाठ्याकाठ्या घेऊन १०० ते १५० जणांचा जमाव बिबट्याच्या शोधात गेला.

बॅटऱ्या लावून व शेकोट्या पेटवून बिबट्यास शोधण्याचा प्रयत्न केला़ परंतु, बिबट्या उमरी, भाटेगाव शिवारात पळून गेला, तो परत कधी येईल, याचा नेम नसल्याने उंचेगाव खु़, इरापूर, वाकी शिवारातील आखाड्यावरील जनावरे सोडून शेतकºयांनी गावात आणली़ बिबट्याच्या दहशतीमुळे अंधार पडण्याच्या आतच शेतकरी घराकडे परतत आहेत़

Web Title: Picnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.