जिल्ह्यातील १ हजार १४ ग्रामपंचायतींचे चित्र होणार स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:15 AM2021-01-04T04:15:45+5:302021-01-04T04:15:45+5:30
जिल्ह्यात सुरू असलेल्या १ हजार १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढतींचे अंतिम चित्र सोमवार, ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्पष्ट ...
जिल्ह्यात सुरू असलेल्या १ हजार १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील लढतींचे अंतिम चित्र सोमवार, ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी संपणार आहे. जिल्ह्यात १ हजार १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक होता. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. आता ४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना चिन्हांचेही वाटप केले जाणार आहे.
जिल्ह्यात १ हजार १४ ग्रामपंचायतींमध्ये ३ हजार २३७ सदस्य निवडले जाणार आहेत. दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेकडून मतदान प्रक्रियेची तयारी केली जात आहे. सोमवारी लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर गावागावात प्रचाराला वेग येणार आहे. यावेळी उमेदवारांना प्रचारासाठी करावयाच्या खर्चात काही प्रमाणात वाढही करण्यात आली आहे. यापूर्वी असलेली २५ हजार रूपये खर्चाची मर्यादा आता ५० हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे.