पाईप विक्रेत्याने शेतकऱ्यांचे अनुदान उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:14 AM2021-06-28T04:14:07+5:302021-06-28T04:14:07+5:30
संदीप गंगाधर ठाकरे यांच्या शेत सर्व्हे क्रमांक १४८ क्षेत्र २ हेक्टर जमिनीवर ठिबक सिंचन संच मिळविण्याकरिता पाईप विक्रेता कंपनीचा ...
संदीप गंगाधर ठाकरे यांच्या शेत सर्व्हे क्रमांक १४८ क्षेत्र २ हेक्टर जमिनीवर ठिबक सिंचन संच मिळविण्याकरिता पाईप विक्रेता कंपनीचा डीलर आश्विन मारोतराव नायके याने परस्पर ऑनलाईन अर्ज केला. बनावट प्रस्ताव संबंधित कार्यालयास सादर करून त्याआधारे ठिबक सिंचनसाठी मंजूर झालेले ९० हजार ५०० रुपये व शासन अनुदान ४८ हजार २५० असे एकूण १ लाख ३८ हजार ७५० रुपये उचलले. त्यासाठी ठाकरे यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली. त्यानंतर विजय ठाकरे यांचा मुलगा कार्तिक ठाकरे याच्या नावानेही अशाचप्रकारे बनावट प्रस्ताव तयार करून त्याद्वारे ६५ हजार ७०० रुपयांचे अनुदान लाटण्यात आले. या प्रकरणात दोन्ही शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास पोउपनि कर्हाळे हे करीत आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोउपनि कर्हाळे यांनी दिली.