पाईप प्रकरणी इतवारा पोलीस नांदेड महापालिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:38 AM2018-03-22T00:38:29+5:302018-03-22T00:38:29+5:30

पाईप चोरी प्रकरणात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही या प्रकरणात कोणताही गुन्हा बुधवारी रात्री उशिरापर्यंत दाखल झाला नाही. त्याचवेळी महापालिकेत बुधवारी इतवारा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली.

In Pip's case, Thakur police station Nanded Municipal Corporation | पाईप प्रकरणी इतवारा पोलीस नांदेड महापालिकेत

पाईप प्रकरणी इतवारा पोलीस नांदेड महापालिकेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: पाईप चोरी प्रकरणात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही या प्रकरणात कोणताही गुन्हा बुधवारी रात्री उशिरापर्यंत दाखल झाला नाही. त्याचवेळी महापालिकेत बुधवारी इतवारा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली.
पाईप चोरी प्रकरण उघडकीस येऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही या प्रकरणातील नेमके आरोपी कोण? याचा उलगडा ना पोलीस करु शकले, ना महापालिका. या दोन्ही विभागाकडून ‘पहले आप, पहले आप’ची भूमिका अदा केली जात आहे. या प्रकरणात तक्रार कोण द्यायची? हाच प्रश्न अद्यापही सुटला नाही. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता या सर्व बाबींचा उलगडा होणे आवश्यक आहे. पोलीस अधीक्षक मीना यांनी मंगळवारी रात्री या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश इतवारा पोलिसांना दिले होते. या आदेशानुसार बुधवारी सकाळी इतवारा पोलीस महापालिकेत दाखल झाले. आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी या प्रकरणात चर्चा झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल, अशी अपेक्षा होती. मात्र रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांनी पाणीपुरवठा कामावर जमिनीत टाकलेले पाईप पोलिसांच्या ताब्यात द्यावे, अशी सूचना महापालिकेला केली आहे. महापालिकेच्या चौकशीमध्ये पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात आलेले काही पाईप चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले होते. चोरीचे पाईप असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच हे काम करणाऱ्या सोहेल कन्स्ट्रक्शनवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई महापालिकेने केली होती.
महापालिकेचे उपअभियंता रफतउल्ला खान व मनपाचे काही कर्मचारी बुधवारी दिवसभर इतवारा पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
कंत्राटदाराने सादर केलेले पाईपांचे देयक देणाºया विजय इंजिनिअरिंग सर्व्हीसेसने पुरवठा केलेल्या ५१ पाईपाचा ना पोलिसांना शोध लागत आहे ना महापालिकेला. महापालिकेने १४ मार्च रोजी या प्रकरणात चौकशी केली असता ५१ पाईप पुरवठा केल्याचे सांगण्यात आले होते. ते ५१ पाईप खुद्द विजय इंजिनिअरिंग सर्व्हीसेसच्या प्रतिनिधींनी वेगळे केले होते. त्यातील ३४ पाईप देयकाप्रमाणे होते. मात्र मात्र उर्वरित १७ पाईपांचा उलगडा अद्यापही झाला नाही. १५ मार्चनंतर पाईप पुरवठा करणाºया ‘विजय’ नेही या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रकरणात इतवारा पोलिसांचे दोन पथके मेदक आणि आदिलाबादला माहिती घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

पाईप चोरी प्रकरण विधानसभेत?
मागील दोन आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या पाईप चोरी प्रकरणात गुन्हा दाखल झाला नसल्याबाबत या विभागाचे प्रतिनिधित्व करणाºया आ. हेमंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा प्रकार आंतरराज्यीय टोळीच्या माध्यमातूनच होत असल्याच्या अनेक बाबी पुढे येत असताना गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचवेळी २३ मार्च रोजी विधानसभेत पाईप चोरी प्रकरणात लक्षवेधी मांडणार असल्याचेही आ. पाटील म्हणाले.

Web Title: In Pip's case, Thakur police station Nanded Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.