दान केलेले अवयव नेण्यासाठी आलेले विमान धावपट्टीवरून घसरले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 12:07 PM2019-09-12T12:07:28+5:302019-09-12T12:21:58+5:30
चार विमाने रद्द
नांदेड - अवयव घेऊन जाण्यासाठी आलेले चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरले विमान धावपट्टीवरून थेट बाजूच्या गवतात शिरले. विमानातील डॉक्टर टीम, पायलट को पायलट सुदैवाने बचावले काल रात्री 12 वाजताची घटना घटना घडली तेव्हा सुरू होता. पाऊस अवयव घेऊन जाण्यासाठी आले होते. 2 विमान, 1 विमान सुरक्षित विमानतळावर पोहोचले मात्र दुसरे अपघातग्रस्त झाले.
नांदेड विमानतळावर उतरताना चार्टर्ड विमान धापट्टीवरुन घसरले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. काल रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. ब्रेन डेड झालेल्या एका तरुणाचे अवयव नेण्यासाठी मुंबईहून नांदेडला एक एअर अँब्युलन्स आणि एक चार्टर्ड विमान आले होते. काल रात्री नांदेडमध्ये पाऊस सुरु होता. या पावसात एअर अँब्युलन्स सुखरूप उतरली. पण लँडिंग करताना दुसरे चार्टर्ड विमान धावपट्टीवरुन खाली घसरले धावपट्टीच्या बाजूला चिखलात फसले.
अपघात घडताच विमानतळावरील कर्मचारी अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. या विमानात असलेले काही डॉक्टर ,पायललट , को पायलट यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे दोन्ही विमानांना उड्डानाची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे ब्रैनडेड व्यक्तीचे अवयव नेता आले नाही. क्रेनच्या सहायाने हे विमान बाहेर काढण्यात येत आहे. याबाबत विमानतळ अधिकाऱ्यांकडून अत्यंत गोपनियता पाळली जात आहे. विमानाचा अपघात नेमका कसा झाला याबाबत अधिकृत माहीती दिली जात नाही. दरम्यान या घटनेनंतर नांदेड-मुंबई, नांदेड-हैद्राबाद, नांदेड -चंडीगड आणि नांदेड-दिल्ली या चार विमानसेवा आज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय