माहूर गडावरील रोप वेला मिळणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:54+5:302021-09-27T04:19:54+5:30

साडेतीन शक्तिपिठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या रेणुकादेवी देवस्थान असलेल्या माहूर गडावर जाण्यासाठी रोप वे उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे होता. त्याअनुषंगाने ...

Plant vines on Mahur fort will get speed | माहूर गडावरील रोप वेला मिळणार गती

माहूर गडावरील रोप वेला मिळणार गती

googlenewsNext

साडेतीन शक्तिपिठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या रेणुकादेवी देवस्थान असलेल्या माहूर गडावर जाण्यासाठी रोप वे उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे होता. त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि 'वॅपकॉस'चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या करारावर स्वाक्षरी केली. माहूर गड येथील रेणुकादेवी मंदिर, श्री दत्त शिखर मंदिर, अनुसुया माता मंदिरासाठी 'रोप वे' उभारणे, तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी 'फूट ओव्हर ब्रीज' व 'लिफ्ट' उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्गनिधीअंतर्गत सुमारे ५१ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. याबाबतच्या करारावरही स्वाक्षरी झाल्याने देवीच्या साडेतीन शक्तिपिठांमध्ये समावेश असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरात 'रोप वे'ने जाऊन दर्शन घेण्याचे भाविकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर विशेषतः वयोवृद्ध भाविकांचा त्रास कमी होणार आहे. माहूर गडाला भेट देणाऱ्या नागरिकांमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. त्यातून या तीर्थक्षेत्राच्या विकासाला अधिक गती मिळेल.

Web Title: Plant vines on Mahur fort will get speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.