पाचशे हेक्टरवर फळबागांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:16 AM2021-02-14T04:16:45+5:302021-02-14T04:16:45+5:30
कृषी विभागाकडून ८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांनी ५०४.९८ हेक्टरवर फळपिकांची लागवड केली आहे. यात आंबा १६४.९० हेक्टर, मोसबी ५०.४० ...
कृषी विभागाकडून ८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांनी ५०४.९८ हेक्टरवर फळपिकांची लागवड केली आहे. यात आंबा १६४.९० हेक्टर, मोसबी ५०.४० हेक्टर, कागदी लिंबू ७२.३३ हेक्टर, पेरु ४८.९४ हेक्टर, चिकू २६.८३ हेक्टर, बोर ०.८०, चिंच २.६०, नारळ ०.५०, सिताफळ ९३.१८ हेक्टरचा समावेश आहे.
बांधावरील लागवडीमध्ये आंबा ३०.९० हेक्टर, आवाळ दोन हेक्टर, नाराळ दोन हेक्टर, चिंच १.५० हेक्टर, जांभूळ एक हेक्टर अशी लागवड करण्यात आली आहे. या सोबतच पडीक जमीनीवरही एक हेक्टर आंब्याची लागवड शेतकऱ्यांनी केली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात फळबागेची सर्वाधिक लागवड कंधार व लोहा तालुक्यात करण्यात आली आहे. लोहा तालुक्यात १७१ शेतकऱ्यांनी १०९.१५ हेक्टरवर फळपिके घेतली आहेत. तर कंधार तालुक्यातील १५१ शेकऱ्यांनी १०३.११ हेक्टरवर फळपिकांची लागवड केली आहे. यासोबतच भोकर, हदगाव, माहूर, धर्माबाद या तालुक्यातही फळबाग लागवड करण्यात आली आहे.