सुखद ! रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार ७८ दिवसांचा बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 12:51 PM2021-10-08T12:51:32+5:302021-10-08T12:54:23+5:30
कोविडची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही रेल्वे कर्मचाऱ्यांनी या कठीणकाळात उत्तम रेल्वे सेवा बजावल्यामुळे बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला
नांदेड : केंद्र सरकारने ७८ दिवसांच्या वेतनाएवढी प्रोडक्टविटी लिकंड बोनस (पीएलबी) रक्कम दिली जाईल अशी घोषणा केली. नांदेड विभागातील सुमारे ४ हजार ९३६ अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. कोरोनाकाळात मिळालेला हा बोनस कर्मचाऱ्यांना सुखावणारा आहे. प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त देय रक्कम १७ हजार ९५१ असेल. ही रक्कम विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाईल. यात ट्रॅक मेंटनर, ड्रायव्हर आणि गार्ड, स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, नियंत्रक, पॉईंटस् मेन, मंत्री कर्मचारी आणि इतर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोविडची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही रेल्वे कर्मचाऱ्यांनी या कठीणकाळात उत्तम रेल्वे सेवा बजावल्यामुळे बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंघ यांनी दिली. या बोनसमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल, तसेच त्यांना अशा कठीण परिस्थितीत काम करण्याची स्फूर्ती मिळेल, अशी अपेक्षा सिंघ यांनी व्यक्त केली. रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी, काम करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी पीएलबीचे पेमेंट एक प्रोत्साहन म्हणून काम करते. बोर्डाच्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचारी खूष आहेत.
हेही वाचा :
- नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार
- रेल्वे स्टेशनवर नातेवाईकांना सोडायला जाणे झाले स्वस्त, प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा १० रुपये!