विस्तारित नगरांमधील नागरिकांचे हाल, चिखलातून काढावा लागतोय मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:22 AM2021-09-05T04:22:43+5:302021-09-05T04:22:43+5:30
पूर्णा रस्ता ते कॅनॉल रस्त्याला जोडणारा शुभम मंगल कार्यालय ते डी मार्ट हा मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे. या ...
पूर्णा रस्ता ते कॅनॉल रस्त्याला जोडणारा शुभम मंगल कार्यालय ते डी मार्ट हा मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्याचे डी मार्ट परिसरातील काम डी मार्टच्यावतीने करण्यात आले. परंतु, पुढे तीनशे ते चारशे मीटर रस्ता करण्याचे औदार्य ग्रामपंचायत दाखवित नाही. या रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेऊन डांबरीकरण अथवा सिमेंट काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. परंतु, सरपंच आणि आमदार यांच्याकडून केवळ आश्वासनाची खैरात होते. मात्र, प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल, असा सवाल संतप्त नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
नागरिक काय म्हणतात,
रस्त्यावरून जाताना माझ्यासमोर दोन ज्येष्ठ नागरिक अणि एक विद्यार्थी डबक्यात पडले. मी जाऊन त्यांना उठवले, असे अतोनात हाल दररोज होत आहेत. - मारोती पावडे, ऑर्किड, नांदेड
माझी मुलगी फक्त रस्त्याला घाबरून दूध बॅग देखील आणण्याला जात नाही, दुधवाला, भाजीवाला, पेपरवाला हे देखील या भागात येण्यास नकार देत आहेत. - मंजुषा ढोले, नांदेड
दररोज एक तरी माणूस, महिला, विद्यार्थी, तरी ह्या रस्त्यावर पडणार म्हणजे पडणारच. मोटार सायकल, किंवा सायकलस्वार स्लिप होणारच, हे ठरलेले आहे, हा एक मृत्यू चा सापळ्यात सापडल्या सारखे आहे. - महेश जाधव, नांदेड