विष प्राशन करून तरुण ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:07 AM2018-10-13T01:07:36+5:302018-10-13T01:08:02+5:30
वैतागून पार्डी (खु) येथील एका विवाहित युवकाने सासरच्या मंडळीसोबत झालेल्या वादानंतर विष प्राशन करुन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना ही बाब लक्षात येताच लगेच त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली़ परंतु, या प्रकारामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाली़
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : वैतागून पार्डी (खु) येथील एका विवाहित युवकाने सासरच्या मंडळीसोबत झालेल्या वादानंतर विष प्राशन करुन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना ही बाब लक्षात येताच लगेच त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली़ परंतु, या प्रकारामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाली़
किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पार्डी खुर्द येथील रहिवासी प्रशांत सुरेश दहीफळे यांचा दोन वर्षांपूर्वी तेलंगणा राज्यातील नळेगाव मंडळ इच्चोडा येथील डोंगरे कुटुंबातील मुलीशी विवाह झाला होता. दरम्यान, प्रशांत आणि सासुरवाडी यांच्यात नेहमीच बेबनाव होता़ अशातच एक मुलगासुद्धा झाल्याचे सांगण्यात आले. सासुरवाडीची मंडळी पत्नीला पाठवत नसल्यामुळे तो निराश झाला होता़ याच निराशेतून त्याने शुक्रवारी दुपारी दुपारी अडीच वाजताचे दरम्यान किनवटात विष प्राशन केले़
विष प्राशन करुन त्यानंतर त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. ठाण्यात आल्यावर त्याच्या हालचालीवरुन पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे यांना संशय आला़ त्यांनी प्रशांतची विचारपूस केली असता, त्याने विष प्राशन केल्याचे सांगितले़ त्यामुळे काहीवेळ पोलीसही चक्रावले होते़ त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तात्काळ उपचार केल्याने त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. सना मेहरीन यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव चौधरी यांनी रुग्णालयात जाऊन प्रशांतची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
- विशेष म्हणजे,या आठवड्यातील आत्महत्येचा प्रयत्न ही दुसरी घटना आहे़ ८ आॅक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या कार्यालयात इनामी जमिनीसाठी दिलीप उबाळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याबाबत पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांना विचारले असता तो विष प्राशन करून आला होता़ त्याच्या सासुरवाडीकडील अडचणीमुळे त्याने विष घेतले असावे असे ते म्हणाले़
सासुरवाडीच्या लोकांना चांगले ठेचा...
प्रशांतने विष पिण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती़ ही चिठ्ठी त्याने जमादार पांढरे यांच्या व्हॉट्सअॅपवर टाकून सासरच्या मंडळींचा उल्लेख केला आहे़ चिठ्ठी पोस्ट केल्यानंतर त्याखाली त्याने टाईप करुन मेसेज लिहिला़ तुम्हाला तुमच्या मित्राची शपथ साहेब या लोकांना फार ठेचा असे लिहिले आहे.