माहूर येथील ३३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:29 AM2018-02-01T00:29:27+5:302018-02-01T00:29:45+5:30
शहरातील सोनपीरबाबा दर्गाह रोडवर असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील ३३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली़ ही घटना बुधवारी घडली़ सर्व विद्यार्थिनींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
माहूर : शहरातील सोनपीरबाबा दर्गाह रोडवर असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील ३३ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली़ ही घटना बुधवारी घडली़ सर्व विद्यार्थिनींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़
या शाळेत सहावी ते दहावीपर्यंतच्या १९० विद्यार्थिनी आहेत़ विद्यार्थिनींना सर्व सुविधा पुरविल्या जातात़ जेवणही दिले जाते़ बुधवारी सकाळचा नाश्ता झाल्यानंतर दुपारी १ वाजता वरण, भात, पत्ता कोबीची भाजी देण्यात आली़ जेवण झाल्यानंतर दुपारी २ च्या दरम्यान पाच विद्यार्थिनींना ओकाºया होवून चक्कर येवू लागली़ त्यांना लगेच माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले़ काही मिनिटानंतर आणखी काही विद्यार्थिनींना मळमळ सुरू झाली़ अशा एकूण ३३ विद्यार्थिनींना रुग्णालयात नेण्यात आले़ विद्यार्थिनींवर डॉ़व्ही़एऩ भोसले यांनी तपासणी करून उपचार केले़
या विद्यार्थिनींमध्ये समीक्षा पाझारे, खुशी बोरकर, श्वेता मेश्राम, तेजस्वीनी खडसे, माधुरी सावते, मयुरी गायकवाड, आरती रामटेके, सिमरन रुकमाने, आरती राऊत, दिव्या राऊत, सानिया खरतडे, तनुश्री लामकरे, पल्लवी हाटकर, प्रेरणा वाघमारे, प्रांजली साळवे, प्रतीक्षा पाईकराव, ऐश्वर्या सावते, ज्योती वाढवे, अंजली पाटील, निकिता चव्हाण, करुणा भरणे, कलयाणी अढागहे, नेहा खंदारे, प्रतीक्षा देवताळे, रोशनी भवरे, प्रगती कंठेश्वर, स्वाती झगडे, वेदिका राऊत, ऋतुजा हापसे, भाविका भगत, प्रज्ञा भवरे, पूजा पतंगे, सोनाक्षी तोडसाम या मुलींवर प्रथमोपचार करण्यात येवून डॉ़व्ही़एऩभोसले यांनी पथकासह शाळेत जावून सर्व मुलींची तपासणी करून शाळेतील अन्न स्वयंपाकगृहाची पाहणी केली़ बनविण्यात आलेल्या सर्व पदार्थांचे नमुनेही घेतले़ तसेच अन्न व औषध प्रशासन विभागालाही घटना कळविण्यात आली़ पाणी नमुनेही घेतले असून कुपनलिका नगरपंचायतच्या नळाचे पाणी तसेच खाजगी टँकरच्या पाण्याचा वापर केला जातो़
वाईबाजार येथील एका एजन्सीकडून २० लिटरचे पाण्याचे कॅन पुरविले जाते़ बुधवारचा स्वयंपाक कुपनलिकेच्या पाण्याने बनविला गेल्याची माहिती देण्यात आली़
मुलींसाठी स्वयंपाक बनविण्याचे कंत्राट पुसद येथील एजन्सीला देण्यात आले़ एजन्सीकडून पाच महिलांद्वारे दररोज स्वयंपाक बनविला जातो़ खात्री केल्यानंतरच मुलींना जेवण दिल्या जाते़ जेवण १६५ मुलींना देण्यात आले़ मात्र ३३ मुलींनाच त्रास झाल्याने ही बाब वरिष्ठांना कळविली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे - एस़एस़ मेश्राम, प्रभारी गृहपाल, पी़ आऱ बुरकुले, मुख्याध्यापक़
सहा मुलींना त्रास जास्त झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ उर्वरित मुलींवर प्राथमिक उपचार करण्यात आले़ ही बाब अन्न व औषध प्रशासनास कळविण्यात आली आहे -डॉ़व्ही़एऩभोसले