पोलिसावर काळाचा घाला; नांदेड- नागपूर महार्गावर अपघातात जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 01:35 PM2023-02-21T13:35:38+5:302023-02-21T13:36:11+5:30
नांदेड-नागपूर महामार्गावर असना पुलावरील घटना
- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड ) : दुचाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस कर्मचाऱ्याचा आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास असणा पुलावर जागीच मृत्यू झाला. मनोहर मारोती पवळे ( कुरूळा ता. कंधार ) असे मृताचे नाव असून ते जिंतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी होते. घटनास्थळी अतीरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, महामार्ग प्र.अदित्य लाकुळे, पोलीस निरीक्षक हानुमंत गायकवाड यांनी भेट दिली.
जिंतूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असलेले मनोहर मारोती पवळे ( ४२) हे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत होते. दरम्यान, असणा पुलावर दुचाकी आणि अज्ञात वाहनाची जबर धडक झाली . यात मनोहर पवळे यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती कि यात दुचाकी चकनाचूर झाली.
घटनेची माहिती मृत्युंजय दुत यांनी पोलीसांना कळवली. घटनास्थळी महामार्ग व अर्धापूर पोलीस दाखल झाले. यावेळी महेश कात्रे, शेख माजिद, वसंत शिनगारे, मृत्युंजय दुत जी.जी. टेकाळे,अजय देशमुख, सयाजी कदम, सतीश श्रीवास्तव, गोविंद कल्याणकर, राजू धाडवे, सचिन खेडकर,ए.एस. बेग,महेंद्र डांगे, बालाजी तोरणे, माधव पाटील यांनी घटनास्थळी मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात मयताचे शव पुढील प्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे पाठविण्यात आले.
अपघातातील मयत पोलीस कर्मचारी मनोहर मारोती पवळे मुळ गाव कुरूळा ता.कंधार असुन ते सध्या नमस्कार चौक येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. या दुर्देवी घटनेबद्दल सर्व स्तरातून हळद व्यक्त होत आहे. सदर घटने प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी एक वाहन ताब्यात घेतले आहे.