जाहिदच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:43 AM2019-01-21T00:43:21+5:302019-01-21T00:43:51+5:30

हज यात्रेच्या नावावर भाविकांना गंडविणाऱ्या मुंबई येथील गोल्डन टूर्स कंपनीच्या जाहिद मलिकला पोलिसांनी अटक केली असून त्याला दुस-यांदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ कंपनीकडून फसवणूक झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आतापर्यंत ४२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे़

Police custody of Zahid | जाहिदच्या पोलीस कोठडीत वाढ

जाहिदच्या पोलीस कोठडीत वाढ

Next
ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : लोहा तालुक्यातील दरोड्याचा यशस्वी तपास

नांदेड : हज यात्रेच्या नावावर भाविकांना गंडविणाऱ्या मुंबई येथील गोल्डन टूर्स कंपनीच्या जाहिद मलिकला पोलिसांनी अटक केली असून त्याला दुस-यांदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ कंपनीकडून फसवणूक झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आतापर्यंत ४२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे़ आता मलिक २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे़
नांदेडातील मोहम्मद युनूस मोहम्मद ईस्माईल पोपटीया (राख़ोजा कॉलनी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती़ पोपटीया यांच्यासह त्यांच्या काही मित्रांनी सप्टेंबर २०१७ मध्ये मुंबईच्या गोल्डन इंटरनॅशनल टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा मालक जाहिद मलिक याच्याकडे हज यात्रेसाठी प्रत्येकी २ लाख रुपये याप्रमाणे ११ लाख रुपये भरले होते़
कंपनीने यात्रेकरुंना पावतीही दिली होती़ परंतु, यात्रा संपल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोपटिया यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यावरुन जाहिद मलिक आणि अमजद मलिक यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ पोलिसांनी १५ जानेवारीला जाहिद मलिक याला मुंबईतून अटक केली होती़ त्यानंतर नांदेड न्यायालयाने त्याला सुरुवातीला १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ त्यानंतर पुन्हा त्याच्या कोठडीत २३ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ दरम्यान, मुंबईच्या या कंपनीने आतापर्यंत ४६ जणांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे़

Web Title: Police custody of Zahid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.