नांदेड येथे आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्न; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:17 PM2018-07-27T13:17:32+5:302018-07-27T13:20:05+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधी चा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधीचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच घरात घुसून लाठीचार्ज केला. ही घटना नांदेड जवळील अमदुरा येथे आज 12 वाजेच्या सुमारास घडली.
यामध्ये अनेकजण जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनावर आंदोलकांनी दगडफेक केली. या ठिकाणी दोनशेहून अधिक पोलीस आणि विशेष पथक दाखल करण्यात आले आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या पाच गाड्यांची तोडफोड केली. यात जवळपास २० आंदोलकांसह पोलीस जखमी झाले आहेत.
यासोबतच नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील पुणेगाव येथे सुद्धा आंदोलकांनी दगडफेक केली. यात चार ते पाच पोलिस वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले. दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले.