पोलिसांनी २० गोवंशास दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:40 AM2019-07-12T00:40:23+5:302019-07-12T00:40:58+5:30
मुदखेड पोलिसांच्या पथकाने १० जुलैच्या मध्यरात्री १ च्या दरम्यान चोरट्या मार्गाने जाणारी दोन वाहने पकडून २० गोवंशाना जीवदान दिले़ या प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हे नोंदवून दोघांना अटक झाली़ दोघे फरार झाले़
मुदखेड : मुदखेड पोलिसांच्या पथकाने १० जुलैच्या मध्यरात्री १ च्या दरम्यान चोरट्या मार्गाने जाणारी दोन वाहने पकडून २० गोवंशाना जीवदान दिले़ या प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हे नोंदवून दोघांना अटक झाली़ दोघे फरार झाले़
शहरातील रमाकांत चौक मुदखेड येथून एकामागून एक अशी दोन वाहने जात होती़ पोलिसांनी संशयावरून ही वाहने पकडली़ यात जवळपास ५ लाख ९० हजार रुपयांचे गोवंश होते़ कुपोषित केलेले, जर्जर व मरणावस्थेत असलेले एकूण २० लहान-मोठे असे गोवंश एम़ एच़ २६-बी़ ई़ २४९० व एम़ एच़ २६-बी़ ई़१०५६ या क्रमांकाच्या वाहनातून जात असताना ते पकडण्यात आले़ या प्रकरणी महंमद खलील महंमद पाशा कुरेशी (रा़मुदखेड), अतुल सुरेश बरगेवार (रा़हदगाव), गोपाळ संजय हरणे (रा़हदगाव), बालाजी रमेश करडेवाड (रा़ल्याहरी, ता़हदगाव) या चौघांविरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले़ यातील दोघांना पकडण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली़ उर्वरित दोघे फरार झाले़ सर्व गोवंश रात्री ताब्यात घेऊन मुक्त करत सकाळी कोल्हा येथील गोशाळेत दाखल केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी दिली.
शहरात अवैध कत्तलखाना चालू असून, येथे मोठया प्रमाणात चोरीचे गोवंश आणि इतर जनावरे कत्तल केली जातात. हा कत्तलखाना बंद करून शहराबाहेर नेण्याची मागणी होत आहे.