किनवट तालुक्यात २४ हजार ४५८ बालकांना दिला पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:07 AM2021-02-05T06:07:52+5:302021-02-05T06:07:52+5:30
शहरातील नागरी दवाखान्यात नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी बालकाला पोलिओ पाजून सुरुवात केली. यावेळी डॉ. किरण नेम्मानीवार, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार, ...
शहरातील नागरी दवाखान्यात
नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी बालकाला पोलिओ पाजून सुरुवात केली. यावेळी डॉ. किरण नेम्मानीवार, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार, डॉ. जडते, सतीश गुरु, सुनील बगाटे, माने, साहेरा परवीना, रत्नमाला भरणे, सपना चव्हाण, परिचारिका वाडे, श्रीनिवास आरपेल्लीवार, श्रीकांत माने महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येकाने घरोघरी जाऊन पोलिओविषयी जनजागृती केली.
सिद्धार्थनगर अंगणवाडी सेविका, आरोग्य सहायक प्रेमिला हाटकर, सीमा राठोड, अर्चना ढाकणे आदिंनी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी प्रयत्न केले.
तालुक्यात शून्य ते पाच वयोगटातील २६ हजार ७६४ लाभार्थी बालके असताना २४ हजार ४५८ बालकांना म्हणजे ९१.७२ टक्के बालकांना पोलिओचा डोज पाजण्यात आला आहे. सुटलेल्या लाभार्थी बालकांना ग्रामीण भागात तीन दिवस व शहरात पाच दिवस गृहभेटी देऊन पोलिओचा डोज पाजण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी दिली