कोरोनावर विजय मिळविण्यासाठी सकरात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:37+5:302021-05-07T04:18:37+5:30
ते ज्येष्ठ समाजवादी नेते कै. नारायणराव चिद्रावार स्मृती ३५ व्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ‘कोरोनाकाळातील आपली मानसिकता’ या विषयावर ...
ते ज्येष्ठ समाजवादी नेते कै. नारायणराव चिद्रावार स्मृती ३५ व्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ‘कोरोनाकाळातील आपली मानसिकता’ या विषयावर बोलत होते. एखाद्या व्यक्तीची ॲन्टिजन टेस्ट अथवा आरटीपीसीआर पॉझिटिव्ह येते तेंव्हा मला विषाणू बाधा झाली हे कळताच व्यक्ती निराश होते. मी इतकी काळजी घेतली तरी माझ्यासोबत असे कसे घडले ? याचा व्यक्तीवर मानसिक आघात होतो. लोकांच्या मनात संशय वाढतो, राग वाढतो. विज्ञानाबद्दल त्यांच्या मनात शंका उपस्थित होते. माझे सर्व नातेवाईक मला पुन्हा पाहू शकणार नाहीत ? मला कोणाची मदत मिळेल की नाही ? नातेवाइकाला तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींना संसर्ग होण्याची भीती देखील वाटू लागते. अशा वेळी आपली मानसिकता स्थिर ठेवून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने उपचार काय आहेत? आपले मानसिक औदासिन्य घालविण्यासाठी कोणते मानसिक उपचार केले पाहिजेत? याची माहिती घ्यावी. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, असे डॉ. पाटकर यानी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किरण चिद्रावार यांनी केला. कै. नारायणराव चिद्रावार यांच्या जीवनकार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
अफवांवर विश्वास ठेवू नका
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनासह सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहे. अशा वेळी समाजमाध्यमांवर फार विश्वास ठेवू नका; परंतु जे योग्य आहे ते विवेकाने उचलले पाहिजे, असे सांगत आजपासून या सकारात्मक कृती व योजनेसह आपण चांगले काय करू शकतो. यावर अधिक भर द्यावा, असे आवाहनही डॉ. पाटकर यांनी केले.