जामिनावर सुनावणी पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:22 AM2019-01-06T00:22:10+5:302019-01-06T00:22:39+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत झालेल्या रस्ते बांधकामात कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा प्रकरणात मोईज या कंत्राटदाराने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता़
नांदेड : सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत झालेल्या रस्ते बांधकामात कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा प्रकरणात मोईज या कंत्राटदाराने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता़ २९ डिसेंबरच्या सुनावणीत न्यायालयाने मोईजच्या अटकेसाठी दोन दिवसांची स्थगिती दिली होती़ या प्रकरणात शनिवारी सुनावणी होणार होती़ न्यायालयाने ही सुनावणी आता ८ जानेवारीला ठेवली आहे़
रस्ते बांधकामाचे काम करणाऱ्या नांदेडातील पाच कंत्राटदारांनी शासकीय कंपनीकडून डांबर खरेदी न करता शासनाची फसवणूक करुन डांबरशेठ या खाजगी व्यक्तीकडून डांबर खरेदी केले होते़ त्यानंतर शासकीय कंपनीकडून डांबर खरेदी केल्याच्या बनावट पावत्या जोडून बिले उचलली होती़ परंत, यामध्ये डांबरशेठ आणि इतर आरोपी अद्यापही मोकळेच आहेत़ मोईज, संत्रे आणि पद्मावार या तिघांचा यात समावेश आहे़
या प्रकरणात मोईज याने जामिनासाठी अर्ज केला होता़ त्यावर २९ डिसेंबरच्या सुनावणीत दोन दिवस अटकेला स्थगिती दिली होती़ त्यानंतर १ जानेवारी रोजी पुन्हा मोईजच्या जामीनावर सुनावणी होणार होती़ न्यायालयाने ही सुनावणी ५ जानेवारीला ठेवली होती़ शनिवारी पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलली असून ती ८ जानेवारीला होणार आहे़