पदोन्नतीने नेमणुका करावयाची पदे दोन वर्षांपासून रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:17 AM2021-04-24T04:17:38+5:302021-04-24T04:17:38+5:30
रिक्त पदांमुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेणे जिकिरीचे होत असून, या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. जोपर्यंत या ...
रिक्त पदांमुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेणे जिकिरीचे होत असून, या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. जोपर्यंत या स्पर्धा होऊन पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नाही, तोवर मधल्या कालावधीसाठी राज्य शासनाने स्टाफ गॅप अरेंजमेंट म्हणून ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने केली आहे. कनिष्ठ सहाय्यक या संवर्गाला सलग सात वर्ष सेवा झाल्याशिवाय परीक्षेला प्राप्त समजले जात नाही. परंतु ग्रामसेवकांना सलग तीन वर्ष सेवा असली तरी पदोन्नतीसाठी पात्र ठरविले जाते. या संदर्भात शासनास वेळोवेळी मागणी केली. चर्चेमध्ये ती मान्य करण्यात आली. परंतु अद्याप निर्णय पारीत केलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तिवेतन हे नियमितपणे मिळावे, कोरोनाने मृत झालेल्या कर्मचाऱ्यास विमा संरक्षण मिळावे, विमा संरक्षण कवचची मुदत ३१ डिसेंबर २०२१पर्यंत वाढवावी, वर्ग ४ मधून वर्ग ३ पदावर कनिष्ठ सहाय्यक म्हणून पदोन्नती द्यावी, महाराष्ट्र विकास सेवा श्रेणीमधील पदोन्नती भरावयाची वर्ग २ची पदे त्वरित भरावीत, बंधपत्रित आरोग्यसेविकांच्या सेवा नियमित कराव्यात, लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा अंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ न द्यावा आदी मागण्याही युनियनने शासनाकडे केल्या आहेत.