अडीच कोटी भरल्यानंतर मनपाचा वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:48 AM2018-11-21T00:48:26+5:302018-11-21T00:50:18+5:30

थकीत वीजबिलापोटी महावितरणने महापालिकेच्या १३ पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे महापालिकेला पाणी पुरवठा करायचा कसा? याची चिंता लागली

Power supply to the municipal corporation after the completion of 2.5 crore | अडीच कोटी भरल्यानंतर मनपाचा वीजपुरवठा सुरळीत

अडीच कोटी भरल्यानंतर मनपाचा वीजपुरवठा सुरळीत

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरणने थकीत देयकापोटी केली होती कारवाई१३ पंपगृहाचा वीजपुरवठा खंडितपाणीपुरवठा वेळापत्रकात बदल

नांदेड : थकीत वीजबिलापोटी महावितरणने महापालिकेच्या १३ पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे महापालिकेला पाणी पुरवठा करायचा कसा? याची चिंता लागली असताना मंगळवारी महापालिकेने २ कोटी ६० लाख रुपये महावितरणकडे भरल्यानंतर हा वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
थकीत वीज बिलापोटी महावितरणने सोमवारी महापालिकेच्या १३ पंपगृहांचा पाणी पुरवठा खंडित केला होता. यापूर्वी महापालिकेने १ कोटी २३ लाख आणि १४ व्या वित्त आयोगातून ७ कोटी ९८ लाख रुपये महापालिकेचे वर्ग करुन घेतले होते. त्याचवेळी मागील थकबाकी ही मोठी असल्याने महावितरणने वीज कापण्याची कारवाई सोमवारी केली होती. या कारवाईमुळे महापालिकेची एकच धांदल उडाली. महावितरणच्या या कारवाईनंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे तसेच विद्युत विभागाचे उपअभियंता सतीश ढवळे यांनी विद्युत भवन येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचवेळी महापालिकेने महावितरणकडे २ कोटी ६० लाख रुपये विद्युत देयकापोटी अदा केले. त्यानंतर महावितरणने विद्युत पुरवठा सुरू केला. एकूणच महावितरणच्या आडमुठ्या धोरणाचा फटका शहरातील पाणीपुरवठ्याला बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. २ कोटी ६० लाख भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत केला. त्याचवेळी पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवेचा वीजपुरवठा खंडित करुन संपूर्ण शहराला वेठीस धरणे कितपत योग्य आहे, हा प्रश्नही पुढे आला आहे. महापालिकेची अडवणूक करण्याचे धोरण स्पष्ट होत असले तरी महापालिकेतील पदाधिकारी मात्र या विषयात पुढेच आलेच नाहीत. प्रशासकीय अधिकाºयांना पुढे केले जात आहे.
पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल
महावितरणने सोमवारी खंडित केलेला वीज पुरवठा मंगळवारी सुरू केला. जवळपास २४ तास वीजपुरवठा बंद असल्याने पंपगृहातून जलकुंभ भरण्यात व्यत्यय आला. हा २४ तासांचा कालावधी भरुन काढण्यासाठी आता ठरावीक वेळापत्रकाच्या एका दिवसानंतर पाणी मिळणार आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी केले.

Web Title: Power supply to the municipal corporation after the completion of 2.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.