कुंडलवाडीत पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:18 AM2021-03-27T04:18:17+5:302021-03-27T04:18:17+5:30

भाग्यश्री जाधवचा सत्कार मुखेड - तालुक्यातील भाग्यश्री जाधव हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. याबद्दल रुग्ण ...

Power supply to street lights off in Kundalwadi | कुंडलवाडीत पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद

कुंडलवाडीत पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद

Next

भाग्यश्री जाधवचा सत्कार

मुखेड - तालुक्यातील भाग्यश्री जाधव हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. याबद्दल रुग्ण सेवा मंडळाचे अध्यक्ष माजी खा. व्यंकटेश काब्दे यांनी तिचा सत्कार केला. यावेळी डॉ. स्मिता भट्टड, डॉ. कुंजम्मा काब्दे, करुणा कोलंबीकर आदी उपस्थित होते.

श्रावस्तीनगरातील पथदिवे बंद

नांदेड - शहरातील श्रावस्तीनगर-राजनगरदरम्यान सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना गणेशनगर, पावडेवाडीनाका, छत्रपती चौक, आयटीआय, शिवाजीनगर येथे जाण्यास सोयीचे झाले. मात्र या भागातील पथदिवे सध्या बंद आहेत. रात्रीच्यावेळी मोकाट कुत्री फिरत असतात. लोकांना कुत्र्यांपासून बचाव करावा लागतो. त्यामुळे मनपाने या भागातील पथदिवे सुरू करण्याची मागणी हाेत आहे.

जवळगावकर यांची भेट

हदगाव - येथील उपजिल्हा रुग्णालयाला आ. माधवराव पाटील-जवळगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयाच्या कारभाराबद्दल रुग्णांच्या अनेक समस्या आहेत. जवळगावकर यांनी भेट दिली तेव्हा हजेरीपटावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या. यावेळी डॉ. व्ही. जे. ढगे यांनी विविध समस्या जवळगावकर यांच्यापुढे मांडल्या.

पोलीस ठाण्याची तपासणी

मुदखेड - येथील पोलीस ठाण्याची तपासणी भोकरचे अतिरिक्त पोलीसप्रमुख विजय कबाडे यांनी गुरुवारी केली. यावेळी पो. नि. महेश शर्मा, सपोनि राजू वटाणे, सुरेश भाले, बलवीर ठाकूर, केशव पांचाळ आदी उपस्थित होते. मागीलवर्षी कोरोनामुळे तपासणी झाली नव्हती.

१६ मतदान केंद्रे

नांदेड - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी २ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण १६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली. यापूर्वी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता ४० उमेदवार रिंगणात आहेत.

पती-पत्नीस मारहाण

कंधार - कंधार तालुक्यातील लिंबातांडा येथे ट्रॅक्टरच्या कारणावरून पती-पत्नीस मारहाण केल्याच्या आरोपातून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सूर्यकांत राठोड व त्यांची पत्नी २४ मार्च रोजी सकाळी घरी असताना आरोपींनी संगनमत करून त्यांना ट्रॅक्टर परत मागितल्याच्या कारणावरून जबर मारहाण केली.

आंदोलन स्थगित

किनवट - आदिवासी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या जमिनी, शेतातील लेआऊट रद्द करावा या व अन्य मागण्यांसाठी आदिवासी संघर्ष समितीच्यावतीने १ जानेवारीपासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे ७ एप्रिलपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती कॉ. शंकर सिडाम यांनी दिली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

प्रवाशांचा रिक्षाने प्रवास

किनवट - लॉकडाऊनमुळे जिल्हाअंतर्गत बसेस बंद असल्याने प्रवासी आता रिक्षातून प्रवास करत आहेत. बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी बसेस, रेल्वे सुरू आहेत. किनवट येथे येणाऱ्या प्रवाशांची किनवट बसस्थानकावर गर्दी होत आहे. मात्र तालुक्यातील बसेस बंद असल्याने अशा प्रवाशांना जे मिळेल ते किंवा रिक्षाने घर गाठावे लागत आहे.

हळद लंपास

अर्धापूर - तालुक्यातील दाभड शहरातील नागोराव दुधमल यांची गट नं. १२३ मध्ये खडकुतजवळ शेती आहे. २३ मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्याने ४५ ते ५० हजार रुपयांची हळद लांबविली. अर्धापूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

ग्रामीण रुग्णालय करा

कंधार - उस्माननगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, अशी मागणी नागेश पांडागळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. उस्माननगर केंद्रांतर्गत अंदाजे २५ ते ३० हजार लोकसंख्या आहे. २ हजार लोकसंख्येला उपकेंद्र असावे, प्रत्यक्षात येथे चार-पाच हजार लोकसंख्येला एक उपक्रेंद्र असल्याचे पांडागळे यांनी नमूद केले.

Web Title: Power supply to street lights off in Kundalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.