काही भागातील वीजपुरवठा राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:26+5:302021-07-01T04:14:26+5:30
महावितरणच्या ३३/११ केव्ही विद्युत भवन या उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या सर्व ११ केव्ही वीजवाहिनीवरील दत्तनगर, फारुखनगर, हनुमानगड, विवेकनगर, विद्युत भवन ...
महावितरणच्या ३३/११ केव्ही विद्युत भवन या उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या सर्व ११ केव्ही वीजवाहिनीवरील दत्तनगर, फारुखनगर, हनुमानगड, विवेकनगर, विद्युत भवन परिसर, स्टेडियम परिसर, रेस्ट हाउस, एमजीएम कॉलेज परिसर, साठे चौक, नवा मोंढा, नमस्कार चौक आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत बंद राहील.
३३/११ केव्ही गुरुद्वारा उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या सर्व ११ केव्ही वीजवाहिनीवरील कलेक्टर ऑफिस परिसर, जिल्हा परिषद, मनपा कार्यालय परिसर, बाफना, चिखलवाडी, अबचलनगर, चौफाळा, चौक, वजीराबाद, महावीर चौक, जुना मोंढा, सोमेश कॉलनी, गुरुव्दारा परिसर, लंगर साहेब परिसर आदी भागाचा वीजपुरवठा सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पावडेवाडी उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या विजयनगर, फरांदेनगर, नसरतपूर, पावडेवाडी गाव परिसर, काबरानगर आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.