नायगावला तीन तालुक्याचे प्रज्ञाशोध परीक्षेचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:19+5:302020-12-11T04:44:19+5:30
इयत्ता १० वीच्या अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे यातून ...
इयत्ता १० वीच्या अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि त्या विकसित बुद्धिमत्तेने विद्यार्थ्यांनी आपली विद्या शाखा व राष्ट्राची सेवा करावी या उद्देशाने ही परीक्षा राज्य परिषद परिषदेमार्फत घेण्यात येते. ही परीक्षा दोन स्तरावर घेण्यात येते. पहिली राज्यस्तरीय परीक्षा १३ डिसेंबर रोजी घेण्यात येत असून या परीक्षेचे नायगाव, देगलूर, मुखेड या तीन तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र जनता हायस्कूल नायगाव बाजार हे आहे. सदरील परीक्षेचे दोन पेपर असून पहिला बाैद्धिक क्षमता चाचणी तर दुसरा शालेय क्षमता चाचणी असे आहेत. हे दोन्ही पेपर एकाच दिवशी राज्य परीक्षा परिषदेने ठरवून दिलेल्या वेळेनुसार घेण्यात येणार आहे. येथील परीक्षा केंद्रावर ४३६ विद्यार्थी आहेत.