जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त शाळा करण्याचा संकल्प-शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:15 AM2021-02-08T04:15:59+5:302021-02-08T04:15:59+5:30

तंबाखूमुक्त शाळा व जाणीव जागृती सप्ताह निमित्ताने ते बोलत होते. यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत यापूर्वी तंबाखूमुक्त ...

Prashant Digraskar, Education Officer, vows to make all schools in the district tobacco free | जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त शाळा करण्याचा संकल्प-शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर

जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त शाळा करण्याचा संकल्प-शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर

Next

तंबाखूमुक्त शाळा व जाणीव जागृती सप्ताह निमित्ताने ते बोलत होते. यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत यापूर्वी तंबाखूमुक्त शाळा हे अभियान राबविण्यात आले असून त्यात बऱ्यापैकी शाळा तंबाखूमुक्त झाल्यात. तसेच आता नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखूमुक्त शाळा याबाबतचे निकष ११ वरून ९ वर आणले आहेत. हा उपक्रम प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या वतीने सुरू आहे. जिल्ह्यात यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांत हा उपक्रम राबविण्यात येत होता. आता मात्र जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवसापासून तंबाखूमुक्त शाळा व जाणीव जागृती सप्ताहाचे आयोजन सर्व शाळांमध्ये कोरोनाचे सर्व शासकीय निर्देश पाळून सप्ताह साजरा करून सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी दिलेले सर्व निकष पूर्ण करून ॲपमध्ये योग्य भरून तंबाखूमुक्त शाळेचे प्रमाणपत्र २६ फेब्रुवारी पर्यंत डाऊनलोड करून आपला जिल्हा तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा म्हणून राज्यात अग्रेसर ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे, दत्तात्रय मठपती, बंडू अमदूरकर, सदरील उपक्रम राबविताना काही तांत्रिक अडचण आल्यास तंबाखूमुक्त शाळा अभियान जिल्हा समन्वयक नागेश क्यातमवार, रवी ढगे, सचिन वानखेडे यांच्याशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Prashant Digraskar, Education Officer, vows to make all schools in the district tobacco free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.