अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:32 AM2021-03-04T04:32:14+5:302021-03-04T04:32:14+5:30
सांगवीत डीपीला आग नांदेड - शहरातील सांगवी भागात महाविरतणच्या डीपी क्रमांक १७ ला वारंवार आग लागत असल्याने या भागातील ...
सांगवीत डीपीला आग
नांदेड - शहरातील सांगवी भागात महाविरतणच्या डीपी क्रमांक १७ ला वारंवार आग लागत असल्याने या भागातील ग्राहक त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या सेवा सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दुचाकी लंपास
नांदेड - गुरुद्वारा चौरस्ता येथील देवीदास कॉम्प्लेक्स येथून दिबागसिंघ वासरीकर यांची दुचाकी चोरट्यांनी पळविली. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून जमादार ढगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गोणारकर यांची निवड
नांदेड - भारत वानखेडे प्रणित अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जगन गोणारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याध्यक्ष वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली.
प्रीती पवार समन्वयकपदी
नांदेड - सावित्रीबाई फुले महिला बचतगटाच्या नांदेड समन्वयकपदी प्रीती भीमराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गटाच्या अध्यक्षा स्नेहलता कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नीलम पावडे, रुद्रावती देशमुख, आकांक्षा पवार, नम्रता राठोड आदींची उपस्थिती होती.
चौकशी करण्याची मागणी
नांदेड - आरोग्य विद्यापीठाच्या भरतीमध्ये गोंधळ उडाल्याचा आरोप करीत या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करून अभाविपच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचा गलथान कारभार पुढे आला असून विद्यार्थ्यांचीही गैरसोय झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.