एस.टी.च्या रातराणीपेक्षाही खासगी ट्रॅव्हल्सना पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:17+5:302021-06-16T04:25:17+5:30
नांदेड येथून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकाेपऱ्यांत जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे. त्याचबरोबर खासगी ट्रॅव्हल्सची संख्या मोठी असून पुणे, मुंबई, ...
नांदेड येथून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकाेपऱ्यांत जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे. त्याचबरोबर खासगी ट्रॅव्हल्सची संख्या मोठी असून पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, सूरत, अकोला आदी शहरांसाठी दररोज शेकडो ट्रॅव्हल्स धावतात. त्याचाही फटका एस.टी.ला बसतो.
लातूर मार्गावर गर्दी
नांदेड विभागातून चालविण्यात येणाऱ्या बसेसपैकी सर्वाधिक गर्दी ही लातूर मार्गावर असते. नांदेड येथून कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूरकडे लातूरमार्गे जाणाऱ्या जवळपास सर्वच बसेस हाऊसफुल्ल होऊन धावतात. त्यात लातूरपर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते.
बसपेक्षा ट्रॅव्हल्सचे तिकीट कमीच
नांदेड येथून पुण्याला दररोज चाळीस ते पन्नास ट्रॅव्हल्स धावतात. दिवाळी तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दोनशे ते अडीचशे ट्रॅव्हल्स दररोज धावतात. त्यात तिकिटाच्या दरातही मोठी वाढ केली जाते. परंतु, आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दराने तिकीट खरेदी करून प्रवास केला जातो. त्यात एस.टी. बस आणि ट्रॅव्हल्सच्या तिकिटात जशी तफावत आहे, तसाच सुविधांमध्येही फरक आहे. वातानुकुलित आणि आरामदायी ट्रॅव्हल्सच्या प्रवासालाच प्रवासी पसंती देतात.
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील अनलॉक प्रक्रियेनंतर नांदेड येथून लांबपल्ल्यासाठी बसेस सोडण्यात येत आहेत; परंतु, प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. कोरोनानंतर एस.टी.चे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून गर्दीच्या मार्गावर अधिक बसेस सोडण्याचेही नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या आरोग्यासाठी कोरोनाच्या नियमावलींचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
- अशोक पन्हाळकर, विभाग नियंत्रक, नांदेड.
जिल्ह्यात सध्या एस.टी.च्या किती फेऱ्या सुरू आहेत.
१०८०
रातराणी - ०४
वाहक - ११६२
चालक - १११५