राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा ३ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणार सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:06 AM2018-01-29T00:06:21+5:302018-01-29T00:06:32+5:30
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित महाराष्टÑ राज्य मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी ३ ते २३ फेब्रुवारीदरम्यान कुसुम सभागृहात दुपारी ४ वाजता तर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रात्री ८ वाजता पार पडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित महाराष्टÑ राज्य मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी ३ ते २३ फेब्रुवारीदरम्यान कुसुम सभागृहात दुपारी ४ वाजता तर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रात्री ८ वाजता पार पडणार आहे.
५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेडसह १९ केंद्रांवर पार पडली. त्यातून अंतिम फेरीसाठी नाटके निवडण्यात आली. साधारणत: अंतिम फेरीतील नाटकांचे सादरीकरण मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी होते. मात्र यावर्षी ही संधी नांदेडवासियांना उपलब्ध झाली आहे. एका दिवशी दोन सभागृहांत नाटकांचे सादरीकरण होणार असले तरी वेळेत अंतर असल्यामुळे रसिकांना या नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे. अंतिम स्पर्धेसाठी एकूण ३७ नाटकांची निवड झाली आहे.
कुसुम सभागृह येथे दुपारी चार वाजता सादर होणारी नाटके अशी- ३ फेब्रुवारी ‘बाजीराव नसतानी’ (औरंगाबाद), ४ फेब्रुवारी ‘इथर’ (सोलापूर), ५ फेब्रुवारी ‘आणि शेवटी प्रार्थना’ (नागपूर), ६ फेब्रुवारी ‘नथींग टू से’ (कोल्हापूर), ७ फेब्रुवारी ‘भिजलेल्या गोष्टी’ (डोंबिवली), ८ फेब्रुवारी ‘अनिमा’ (सोलापूर), ९ फेब्रुवारी ‘सुई धागा’ (मुंबई), १२ फेब्रुवारी ‘नांगर’ (सांगली), १३ फेब्रुवारी ‘निखारे’ (सिंधुदुर्ग), १४ फेब्रुवारी ‘द गिफ्ट’ (पुणे), १५ फेब्रुवारी ‘अखंड’ (औरंगाबाद), १६ फेब्रुवारी ‘पुस्तकाच्या पानातून’ (परभणी), १७ फेब्रुवारी ‘भेटी लागी जीवा’ (मुंबई), १८ फेब्रुवारी ‘कॅप्टन कॅप्टन’ (रत्नागिरी), १९ फेब्रुवारी ‘ मून विदाऊट स्काय’ (नाशिक), २० फेब्रुवारी ‘कु. सौ. कांबळे’ (अमरावती), २१ फेब्रुवारी ‘एलगोरीया दी लेडी ओर दी टायगर’ (दादर मुंबई), २२ फेब्रुवारी गोवा केंद्रावरील नाटक सादर होणार आहे. कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रात्री आठ वाजता सादर होणारे नाटके अशी-३ फेब्रुवारी ‘रक्षन्ति रक्षित’ (नागपूर), ४ फेब्रुवारी ‘आदिम’, ५ फेब्रुवारी ‘दर इंटरव्ह्यू’ (नवी मुंबई), ६ फेब्रुवारी ‘समीकरण’ (पुणे), ७ फेब्रुवारी ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ (मंबई), ८ फेब्रुवारी ‘सत्यदास’ (इंदोर), ९ फेब्रुवारी ‘कुलकर्णी आणि कंपनी’ (मुंबई), १० फेब्रुवारी ‘अम्मी’ (मुंबई), १२ फेब्रुवारी ‘पार्सल’ (सांगली), १३ फेब्रुवारी ‘द फोर्थ वे’ (जळगाव), १४ फेब्रुवारी ‘दर्द ए डिस्को’ (कोल्हापूर), १५ फेब्रुवारी ‘मृत्यूकडून जीवनाकडे’ (नांदेड), १६ फेब्रुवारी ‘मर्डरवाले कुलकर्णी’ (अहमदनगर), १७ फेब्रुवारी ‘सल’ (नवी मुंबई), १९ फेब्रुवारी ‘वाडा चिरेबंदी’ (यवतमाळ), २० फेब्रुवारी ‘उत्तरदायित्व’ (नाशिक), २१ फेब्रुवारी ‘दोजख’ (कल्याण), २२ फेब्रुवारी ‘आकार’ (पुणे) या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.
नाटकांचा रसिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने केले आहे.