बोगस बियाणे रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाचे १७ भरारी पथके स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:31 AM2018-04-21T00:31:22+5:302018-04-21T00:31:22+5:30
बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या बोगस बिटी बियाणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याचवेळी कृषी विभागाचे एक जिल्हास्तरीय आणि सोळा तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. बोगस बियाणे संदर्भात, साठवणूक आदी बाबत कृषी विभागाकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या बोगस बिटी बियाणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याचवेळी कृषी विभागाचे एक जिल्हास्तरीय आणि सोळा तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. बोगस बियाणे संदर्भात, साठवणूक आदी बाबत कृषी विभागाकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात यवतमाळसह राज्यात मोठया प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामागील कारणांचा वेध घेतेवेळी एच.टी. बी.टी. कापूस बियाणांची अवैधरित्या मोठया क्षेत्रावर लागवड झाल्याची बाब समोर आली होती.
आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच गुजरात राज्यातून या बियाण्याचा पुरवठा झाल्याचेही उघडकीस आले होते. त्यामुळे हंगामात एच. टी. बियाणे अवैधरित्या शेतकºयांपर्यंत पोहचणार नाही, या करीता कृषी विभागामार्फत जिल्हा स्तरावर १ व तालुकास्तरावर १६ असे एकूण १७ भरारी पथकांची स्थापना केली आहे.
क्षेत्रीय कर्मचाºयांच्या माध्यमातून जागृती अभियान राबविले जात आहे. तसेच शेतकºयांनी अवैध व पर्यावरण विरोधी एच.टी. बी.टी. कापूस बियाणे खरेदी करु नये व लागवड करु नये. जर एच.टी. बी.टी. कापूस बियाण्यांची विक्री, साठवणूक, बुकींग बाबत माहिती प्राप्त झाल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ तसे कृषी विभागातील अधिकाºयांशी व पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधावा.
शेतकºयांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये व संभाव्य नुकसान टाळण्याकीरता मान्यता प्राप्तच कापूस बियाणे खरेदी करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे सभापती कृषी व पशुसंवर्धन समितीचे रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण रेड्डी यांनी केले आहे.
शेतकºयांनी ही खबरदारी घ्यावी
खरीप हंगाम २०१८ मध्ये बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक औषधी खरेदी करताना शेतकºयांनी, गुणवत्ता व दर्जाची हमी देणाºया अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. अधिकृत विक्रेत्यांकडून पक्या पावतीसह खरेदी करा. पावतीवर शेतकºयांची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन पीक निघेपर्यंत पावत्या सांभाळून ठेवाव्यात. खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन,पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतीम मुदत पाहून घ्या. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष, दूरध्वनी, ई-मेल,एस.एम.एस.,द्वारे कराव्यात. तक्रारी सोडविण्यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४००० वर संपर्क साधावा.