कोरोना काळात आव्हानात्मक कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:20 AM2021-03-09T04:20:38+5:302021-03-09T04:20:38+5:30
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रातपवार यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यातील लोकसंख्या लक्षात ...
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रातपवार यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यातील लोकसंख्या लक्षात घेत ग्रामीण भागात सेवा-सुविधा पोहोचविण्यासमवेत आरोग्य विभागाने तब्बल १ हजार ५८ कॅट्रॅक्स आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून यासाठी योगदान देणाऱ्या डॉ. रोशन आरा तडवी यांच्यासह कोरोनाच्या काळात नेत्रशल्यचिकित्सा विभाग सांभाळणाऱ्या डॉ. कल्पना वाकोडे, डॉ. सुजाता राठोड, डॉ. खान साबा अशरफ, डॉ. अर्चना बजाज, प्रयोगशाळा तज्ज्ञ ज्योती बागल, परिचारिका मालती वाघमारे, जयश्री वाघ, अहवाल नोंदणी विभागातील शुभधा गोसावी, अर्पणा जाधव, रुग्ण व्यवस्थापक डॉ. मसरत सिद्दीकी, स्वच्छता विभागातील किरण हटकर, कोमल दुलगच, समुपदेशक ज्योती पिंपळे, संतोषी रतनसिंघ मंगोत्रा, विशाखा आर. बापटे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी हॅपी क्लबचे कार्यकर्ते मोहमंद शोएब यांच्या आई शबाना बेगम यांचाही प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. मीना सोलापुरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी दीपाली मोतियळे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, शरद मंडलिक, अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे, आदी उपस्थित होते.