नांदेडमध्ये हौशी मराठी नाट्यस्पर्धेची १६ नोव्हेंबरपासून प्राथमिक फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:49 AM2018-11-11T00:49:47+5:302018-11-11T00:50:48+5:30
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५८ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड केंद्रावर १६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
नांदेड : महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५८ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड केंद्रावर १६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १६ नोव्हेंबर रोजी ज्ञानसंस्कृती सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने ‘नरक चतुर्दशी, १७ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने ह्या नावाचं काय करायचं?, १८ नोव्हेंबर रोजी क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने ‘दुसरा अंक’, १९ नोव्हेंबर रोजी ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेडच्या वतीने ‘नाच्या कंपनी’, २० नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नांदेडच्या वतीने ‘तलेदण्ड’, २१ नोव्हेंबर रोजी धनंजय शिंगाडे बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उस्मानाबादच्या वतीने ‘चक्रव्यूह’, २२ नोव्हेंबर रोजी नटरंग कला मंडळ, बीडच्या वतीने ‘अल्बम’, २३ नोव्हेंबर रोजी नटराज कलाविकास मंडळ, ता. जिंतूर, जि. परभणीच्या वतीने ‘देशमाने हाजीर हो’, २४ नोव्हेंबर रोजी निपॉन सोशल वेलफेअर सोसायटी, बोरी, ता. उमरगा तुळजापूर, जि. उस्मानाबादच्या वतीने ‘गावगुंडांचा विषारी विळखा’, २५ नोव्हेंबर रोजी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने ‘खिडक्या’, २६ नोव्हेंबर रोजी प्रबोधन सेवाभावी संस्था, परभणीच्या वतीने ‘रात्र माणसाळलेली’, २७ नोव्हेंबर रोजी सर्वोदय शिक्षण कला अकादमी, परळी वै., जि. बीडच्या वतीने ‘हणम्याची मरीआय’, २८ नोव्हेंबर रोजी सरस्वती प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने ‘वारूळ’, २९ नोव्हेंबर रोजी श्री संत गजानन महाराज सेवाभावी संस्था, ता. हदगाव, जि. नांदेडच्या वतीने ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ३० नोव्हेंबर रोजी शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने ‘कोणी जात देता का? जात...?’ १ डिसेंबर रोजी समर्थ निसर्ग मंडळ, परभणीच्या वतीने ‘अनभिज्ञ’ हे नाटक सादर होईल, अशी माहिती संयोजकांनी दिली.