२५ वाडी-तांड्यांवर पुरक नळयोजनांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:48 AM2019-04-04T00:48:43+5:302019-04-04T00:50:34+5:30
कंधार तालुक्यात आतापर्यंत ३३ विहिरी अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयामार्फत प्राप्त झाले होते. त्यापैकी २६ विहिरींचे अधिग्रहण प्रस्ताव तसेच २५ वाडी-तांड्यांवरील पुरक नळयोजना व तात्पुरती नळ दुरुस्तीच्या कामास प्रथम प्राधान्य देत तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी पाणीटंचाई प्रश्न मार्गी लावला आहे.
गोविंद शिंदे।
बारुळ : कंधार तालुक्यात आतापर्यंत ३३ विहिरी अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयामार्फत प्राप्त झाले होते. त्यापैकी २६ विहिरींचे अधिग्रहण प्रस्ताव तसेच २५ वाडी-तांड्यांवरील पुरक नळयोजना व तात्पुरती नळ दुरुस्तीच्या कामास प्रथम प्राधान्य देत तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी पाणीटंचाई प्रश्न मार्गी लावला आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामाची कसून तपासणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
कंधार तालुक्यात एकाही पाण्याच्या टँकरसाठी मान्यता मिळाली नसल्याने टँकर सुरु करण्यात आले नाहीत. कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ ८ कोटी ३६ लाख खर्च करून उपाययोजना करण्यास प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे. तालुक्यातील वाडी- तांड्यांवर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने सन २०१८ - २०१९ पाणीटंचाई भासू नये म्हणून उपाय योजना करणे चालू आहे. कायमस्वरुपी पाणीटंचाई प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना गतकाळात केल्या़
परंतु त्या निष्प्रभ ठरल्या. कंधार तालुक्यातील ४७ गावांत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठ्याच्या नावाखाली ९ कोटी ४४ लाख ७४ हजार एवढा निधी येऊनही कंधार तालुक्यातील वाडी-तांडे तहानलेलेच असल्याची तक्रार मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने करुन चौकशी करण्याचे निवेदन दिले होते.
पैकी राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित झालेली गावे घोडज येथील तीन व दिग्रस खुर्द येथील योजनेच्या कामाची तात्काळ तपासणी करुन कार्यवाहीबाबतचे आदेश संबंधितांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर पानशेवडी, सावेळेश्वर गुंडा-बिंडा- दिंडा, शिरशी बु., खंडगाव (ह.), वहाद येथील कामाची तपासणी होणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ पंचायत समिती कार्यालयातून प्राप्त विहीर, बोअर अधिग्रहण प्रस्तावांपैकी तळ्याचीवाडी, हिरामणतांडा -१, मंगलसांगवी -३, हटक्याळ-३, भेंडेवाडी-१, मादाळी-१, मसलगा-२, कुरुळा-१, हासूळ-३, आंबुलगा -२, पिंपळ्याचीवाडी-१, टोकवाडी-१, ब्रम्हवाडी-१, हिप्परगा शहा-१, कौठावाडी- १, लिंबातांडा -१, जाकीपूर-२, हाळदा-१ आदी गावांत २५ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत सुमारे २६ विहिरींचे अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
तसेच १ आॅक्टोबर २०१८ ते ३० जुलै २०१९ या पाणीटंचाई कालावधीसाठी पुरक पाईपलाईन दुरुस्ती, नवीन पाईपलाईन, विहिरींची खोली वाढवणे आदी योजनांपैकी हजारो रुपयांची तात्पुरती पुरक नळ योजनात मानसिंगवाडी, लिंबातांडा, चोळीतांडा, गुट्टेवाडी, बाचोटी, आलेगाव, शिरशी (बु.) आदीचे प्रस्ताव प्राप्त झाले. तर नळयोजना विशेष दुरुस्तीत मुंडेवाडी, घोडजतांडा, संगमवाडी, पानशेवडी, गणातांडा, वळसंगवाडी, औराळ, बाचोटी तांडा, नागलगाव उदातांडा, दुर्गातांडा, कुरुळा नरपटवाडी, रुई, सावरगाव नि., गुंडाबिंडा, दिंडा, काटकळंबा, खंडगाव ह., शिराढोण आदी वाडी- तांड्यांवर नळयोजना विशेष दुरुस्ती प्रस्ताव मान्यता मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले आहेत.
कंधार तालुक्यातील वाडी तांड्यांवर संभाव्य पाणीटंचाई पाहता लोकसभा निवडणूक कामात अधिकारी- पदाधिकारी व्यस्त असतानाही पाणीटंचाई कामास प्राधान्य असल्याची माहिती मांडवगडे यांनी दिली. यासाठी नायब तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार कुलकर्णी, उत्तम जोशी, बळवंत वरपडे परिश्रम घेत आहेत.
१ आॅक्टोबर २०१८ ते ३० जुलै २०१९ या पाणीटंचाई कालावधीसाठी पुरक पाईपलाईन दुरुस्ती, नवीन पाईपलाईन, विहिरींची खोली वाढविणे आदी योजनांपैकी हजारो रुपयांची तात्पुरती पुरक नळ योजनेत मानसिंगवाडी, लिंबातांडा, चोळीतांडा, गुट्टेवाडी, बाचोटी, आलेगाव, शिरशी (बु.) आदींचे प्रस्ताव प्राप्त झाले. तर नळयोजना विशेष दुरुस्तीत मुंडेवाडी, घोडजतांडा, संगमवाडी, पानशेवडी, गणातांडा, वळसंगवाडी, औराळ, बाचोटी तांडा, नागलगाव उदातांडा, दुर्गातांडा, कुरुळा नरपटवाडी, रुई, सावरगाव नि., गुंडा, बिंडा, दिंडा, काटकळंबा, खंडगाव ह., शिराढोण आदी वाडी- तांड्यांवर नळ योजना विशेष दुरुस्ती प्रस्ताव मान्यता मिळण्यासाठी वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आले आहेत.