खासगी बँकाना शेतकऱ्यांचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:22 AM2021-09-14T04:22:32+5:302021-09-14T04:22:32+5:30
चौकट... खरिपाचे पीक हाताशी...कर्जाच्या फायली टेबलाशी... खरीप अथवा रब्बीमध्ये पेरणी करण्यासाठी लागणारे खत, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध व्हावा, ...
चौकट...
खरिपाचे पीक हाताशी...कर्जाच्या फायली टेबलाशी...
खरीप अथवा रब्बीमध्ये पेरणी करण्यासाठी लागणारे खत, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने शासनाच्यावतीने पीक कर्ज वाटप केले जाते. परंतु, पिके हाताशी येण्याची वेळ झाली तरी अद्यापपर्यंत हजारो शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर झालेले नाही. शेतकऱ्यांची बँकांकडून होणारी अडवणूक थांबविण्याची गरज आहे तसेच लक्षांक पूर्ण न करणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या नशिबी रांगाच...
आजघडीला अतिवृष्टीने बाधित पिकांची नुकसानभरपाई मिळविण्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. यापूर्वी पीक कर्ज मिळविण्यासाठी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या रांगा बँकांपुढे दिसून आल्या होत्या. अनेकांना पीक कर्ज न मिळाल्याने त्यांनी सावकारी कर्ज, उसनवारी करून खरिपाची पेरणी केली होती; परंतु, अतिवृष्टीने घात केल्याने आता शेतकऱ्यांच्या मदतीला कोण धावणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित करत आहेत.
नवीन निर्णयानुसार शासनाने पीककर्जावरील अडीच लाखांपर्यंत स्टॅम्पड्युटी माफ केली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे सोबत २०१५ नंतरच्या पीककर्जाचे पुनर्गठणही केले जात आहे. परंतु, बँकांकडून शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.