महाबीजच्याच धर्तीवर खासगी कंपन्यांनी सोयाबीन बियाणे दर ठेवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:18 AM2021-05-08T04:18:17+5:302021-05-08T04:18:17+5:30
खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणेचा लवकरच बाजारात पुरवठा सुरू होणार आहे त्यादृष्टीने शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाण्यांच्या दराकडे लक्ष लागून आहे. ...
खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणेचा लवकरच बाजारात पुरवठा सुरू होणार आहे त्यादृष्टीने शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाण्यांच्या दराकडे लक्ष लागून आहे. दोन दिवसांपूर्वीच महाबीजने आपल्या बियाण्यांच्या दराचा निर्णय घेत चालू खरीप हंगामासाठी मागच्या वर्षीचे दर कायम ठेवले आहेत. यावर्षी शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम दरवाढ न करून खासगी कंपन्यांनी द्यावे, परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवरील निर्बंध मागे घेतले आहेत, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे मुबलक मिळणार आहे, सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्या जास्तीत जास्त मध्यप्रदेशच्या असून या सर्व कंपन्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन दरवाढ करू नये, अशी मागणी केली आहे.