पैनगंगा नदीपात्रात दिगडी-साकूर बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:00 AM2018-03-28T01:00:01+5:302018-03-28T11:23:17+5:30
माहूरकरांची पाणी समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायतने हालचाली सुरु केल्या असून, २७ मार्च रोजी पालिका तिजोरीतून ३ लाख ६० हजारांचा डीडी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आखाडा बाळापूरकडे भरणा केल्याने ३० मार्चपर्यंत दिगडी-धानोरा धरणातून आरक्षित १ दलघमी पाणी माहूरजवळील धनोडा- पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधा-यात सोडण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर: माहूरकरांची पाणी समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायतने हालचाली सुरु केल्या असून, २७ मार्च रोजी पालिका तिजोरीतून ३ लाख ६० हजारांचा डीडी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आखाडा बाळापूरकडे भरणा केल्याने ३० मार्चपर्यंत दिगडी-धानोरा धरणातून आरक्षित १ दलघमी पाणी माहूरजवळील धनोडा- पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधा-यात सोडण्यात येणार आहे.
माहूरची पाणीपुरवठा हडसणी, रुई, कुतेमारदिडगी, अनमाळ व इतर गावांतील पाणीयोजना पैनगंगा नदीवर अवलंबून असून आजघडीला पैनगंगा कोरडीठाक झाली. पाणी समस्या सोडविण्यासाठी इसापूर धरणातून किंवा हिंगणी बंधाºयातून पैनंगगेत पाणी सोडणे नितांत गरजेचे होते. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आखाडा बाळापूरकडे भरणा करण्यासाठीची रक्कम श्री रेणुकादेवी संस्थान व ऩप़ंने संयुक्तरित्या भरणा करावी यासाठी पालिकेने रेणुकादेवी संस्थानकडे पत्रव्यवहार केला, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. पेयजल समस्येवर मात करण्यासाठी ऩप़ंने २७ मार्च रोजी ३ लक्ष ६० हजार रुपयांचा डी़डी़ भरणा करून दिगडी बंधाºयातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली, अशी माहिती नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी दिली.
गेट दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर
पैनगंगा कोल्हापुरी बंधा-याच्या बसवलेल्या गेटला तळपत्री व अन्य वस्तूने दुरुस्ती करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. नदीपात्रात रेतीमाफियांनी अवैध रेती उपसा केल्याने मोठमोठे खड्डे पडले असून दिगडी बंधाºयातून पाणी सोडल्यानंतरही या अवैध उत्खननामुळे पाणी कोल्हापुरी बंधाºयापर्यंत पोहोचू शकणार नाही याची खात्री ऩपं़ला पटल्याने मंगळवारपासून जेसीबीच्या मदतीने नदीपात्रामधील खड्डे व्यवस्थित केले जात आहेत. ३० मार्च रोजी पाणी कोल्हापुरी बंधाºयात पोहोचल्यास माहूरची विस्कळीत पाणीपुरवठा योजना रुळावर येण्याची शक्यता आहे.