अस्तित्वात नसलेल्या कॉलेजला २० टक्के अनुदानाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:41+5:302021-08-21T04:22:41+5:30
या सभेत जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू केलेल्या ‘मिशन आपुलकी’ या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी, पालक, व्यापारी, नागरिकांनी ...
या सभेत जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू केलेल्या ‘मिशन आपुलकी’ या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी, पालक, व्यापारी, नागरिकांनी शाळांना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन सभापती बेळगे यांनी केले. कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या वारसाला सर्व लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. निवडश्रेणी, चट्टोपाध्याय श्रेणी, कस्तुरबा प्राथमिक शाळेतील अनियमिततेबाबतही या बैठकीत चर्चा झाली. हिमायतनगर येथील शाळेत गणित व इंग्रजी विषयाचे शिक्षक नसल्याची बाब ज्योत्स्ना नरवाडे यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावेळी विशेष शिक्षकातून या ठिकाणी तात्पुरती नियुक्ती करण्याचे निर्देश दिले.
शिक्षकांना आतापर्यंत निवड श्रेणी दिली नाही. तसेच चट्टोपाध्यायचे कामही पूर्णत्वास गेले नाही. ही कामे वेळेत पूर्ण करावी, अशी मागणी लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी दिली. माध्यमिक शिक्षकांच्या बदल्यामध्ये अनियमितता झाल्याचा विषयही चर्चेत आला. या बदली प्रक्रियेची संपूर्ण माहिती द्यावी, अन्यथा आपण न्यायालयाचे दार ठोठावू, असा इशारा सभेतच धनगे यांनी दिला. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक दिवस निश्चित करावा, जिल्हा परिषद पातळीवर या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी बसवराज पाटील यांनी केली. बैठकीस व्यंकटराव पाटील गोजेगावकर, अनुराधा पाटील, संध्याताई धोंडगे, संतोष देवराये, शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, अधीक्षक बळीराम येरपूलवार, डी.एस. मठपती, योगेश परळीकर, बी.एम. गोटमवाड, विलास ढवळे आदींची उपस्थिती होती.