कंधार तालुक्यासाठी साडे नऊ कोटीचा दुष्काळ कृती आराखडा प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 06:00 PM2019-01-29T18:00:24+5:302019-01-29T18:01:10+5:30

दोन टप्प्याचा ९ कोटी ५३ लाख १० हजाराचा कृती आराखडा प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. 

Proposed draft plan of 9.9 crore for Kandhar taluka drought relief | कंधार तालुक्यासाठी साडे नऊ कोटीचा दुष्काळ कृती आराखडा प्रस्तावित

कंधार तालुक्यासाठी साडे नऊ कोटीचा दुष्काळ कृती आराखडा प्रस्तावित

Next

कंधार (नांदेड ) : येणाऱ्या काळात तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई भिषण रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दोन टप्प्याचा ९ कोटी ५३ लाख १० हजाराचा कृती आराखडा प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. 

गतवर्षी अपूऱ्या पावसाने, दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर यांना मोठा संघर्ष करावा लागला. २०१८-१९ सालात अपुरा व दिर्घ अंतराने झालेल्या पावसाने व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. यातच आता जलसाठे नदी, नाले, तलाव कोरडे पडल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे तालुक्यातील दुष्काळी स्थितीवर मत करण्यासाठी प्रशासनाने दुष्काळी कृती आराखडा तयार केला आहे.

या नुसार पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च- २०१९ या कालावधीत ५ कोटी ५७ लाख ४६ हजार खर्च अपेक्षित आहे. तर एप्रिल ते जून- २०१९ या दुसऱ्या टप्प्यात टँकरवर मोठी मदार राहणार असे संकेत आहेत. टँकरवर २ कोटी ४० लाखाचा खर्च अपेक्षित आहे.

Web Title: Proposed draft plan of 9.9 crore for Kandhar taluka drought relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.