मुखेड, किनवट येथे निषेध रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:19 AM2019-03-08T00:19:21+5:302019-03-08T00:19:45+5:30

राज्यातील मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड वर्गीकरणानुसार आरक्षण देण्यात यावे या मागणी साठी जलसमाधी घेतलेल्या संजय ज्ञानोबा ताकतोडे यांच्या कुंटुबाला २५ लाख रुपयाचे अनुदान द्यावे, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गवारी प्रमाणे आरक्षण द्यावे, या मागण्यांसह सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध करण्यासाठी मुखेड येथे ७ मार्च रोजी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर रॅली काढण्यात आली़

Protest rally at Mukhed, Kinwat | मुखेड, किनवट येथे निषेध रॅली

मुखेड, किनवट येथे निषेध रॅली

googlenewsNext

मुखेड : राज्यातील मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड वर्गीकरणानुसार आरक्षण देण्यात यावे या मागणी साठी जलसमाधी घेतलेल्या संजय ज्ञानोबा ताकतोडे यांच्या कुंटुबाला २५ लाख रुपयाचे अनुदान द्यावे, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गवारी प्रमाणे आरक्षण द्यावे, या मागण्यांसह सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध करण्यासाठी मुखेड येथे ७ मार्च रोजी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर रॅली काढण्यात आली़
ताकतोडे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत समाविष्ट करावे, अशी मागणी करत मातंग समाजाच्या आरक्षण प्रकरणी विविध संघटनांनी लावुन धरलेल्या मागणीकडे मुख्यमंत्री जाणुन बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला़ मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील मातंग समाजाचा तरुण कार्यकर्ता संजय ज्ञानोबा ताकतोडे यांच्या आत्महत्येस प्रर्वत करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला़ निवेदनावर भारतीय लहुजी सेनेचे मराठवाडा प्रमुख गणपतराव गायकवाड, रमेश बदार्पुरे, पंकज गायकवाड, प्रितम गवाले, नितिन तलवारे, कैलास आंदे, बालाजी गायकवाड, अनिल कावडे, सरपंच परशुराम गवाले आदींचे सह्या आहेत.
यावेळी नामदेवराव वाघमारे, सुनीता गायकवाड, सग्याबाई गाउकवाड, प्रेमला वाघमारे, खलिताबाई सोमवारे, चौञाबाई कांबळे आदी उपस्थित होते.
लसाकमचे निवेदन
लसाकम शाखा किनवट च्या वतीने शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला़ यावेळी लसाकम चे अध्यक्ष संजय तलवारे ,सचिव कृष्णकांत सूनकलवाड,डॉ सुरेंद्र शिंदे, प्राचार्य डॉ आनंद भंडारे,दुगार्दास बटूर, तुकाराम जळपतराव, आनंद भालेराव, प्रा समूखराव,बसवंते आदी उपस्थित होते़
सरकारच्या बेजबाबदारपणाचा निषेध
किनवट : संजय ताकतोड यांनी घेतलेली जलसमाधी ही अत्यंत दुदैवी असून सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना घडली असून सरकारच्या धोरणाचा किनवट येथील सकल मातंग समाजाच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला़ या बाबतचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मातंग समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करावे, संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाला शासनाने त्वरीत २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे,या मागण्यांचे निवेदनात देण्यात आले़ मागण्या मान्य न झाल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला़ निवेदनावर माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, शिवन्ना कलगोटवार,गंगाधर तोटरे, नारायण सांगळे, मारोती सुंकलवाड,आनंद भालेराव, बापूराव माहूरकर, मारोती तोटरे, सुरेश मंत्रीवार,दंत्तोपंत पोलेवार,संजीव कोत्तुरवार,मोहन बोलेनवार,रवि उप्परवार,अशोक आरपेल्लीवार, नंदकुमार बसवंते,के. स्वामी, प्रवेश संकेवार, अरुण मुकनपेल्लीवार,दत्ता गडलवाड,आकाश भंडारे,अशोक मारपवार, आकाश बोल्लेनवार यांच्या स्वाक्ष-या आहेत.
मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
संजय ताकतोड यांच्या आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अण्णाभाऊवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली़ यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची आर्थिक मदत करावी, अनुसूचित जाती अबकड वर्गीकरणाची शिफारस केंद्र शासनाकडे करावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या़ निवेदनावर आकमचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रा़ सदाशिव भुयारे, सरचिटणीस अंतेश्वर बंदुकी, प्रा़ इरवंत सूर्यकर, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, अण्णाभाऊवादी स्टुडंटस फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दिलीप कंधारे, महासचिव माधव भुयारे, अरविंद कु-हे आदींच्या स्वाक्ष-या आहेत़

Web Title: Protest rally at Mukhed, Kinwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.