अर्णब गोस्वामीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:24+5:302021-01-25T04:18:24+5:30

टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दास गुप्ता यांच्या चौकशीदरम्यान ...

Protests of Nationalist Students Congress against Arnab Goswami | अर्णब गोस्वामीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने

अर्णब गोस्वामीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने

Next

टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दास गुप्ता यांच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलिसांना दास गुप्ता व अर्णब गोस्वामी यांच्यासोबत व्हाॅट्सॲपवर झालेल्या संभाषणाची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र झळकत आहे. तसेच पुलवामा हल्ल्यात देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या ४० जवानांचा मृत्यू झाल्यानंतर अर्णब यांना झालेला आनंद देशद्रोहाचा गुन्हा चालवण्यासाठी पुरेसा आहे. देशहिताला दुय्यम समजून स्वतःच्या स्वार्थाकरिता देशाची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या अशा देशविघातक कृत्य करणाऱ्या विरोधात सुरक्षा कायद्यांंतर्गत कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महात्मा जाेतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पअर्पण करून तीव्र स्वरूपात निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रशांत कदम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नांदेड शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम, शुभम जटाळ, कल्पना डोंगळीकर, डॉ. मुजाहिद खान, श्रीधर नागापूरकर, सचिन जाधव, प्रश्नांत कदम, गणेश तादलापूरकर, युनूस खान, शफी रहमान, धनंजय सूर्यवंशी, फैसल सिद्दीकी, प्रसाद पवार, गजानन कराळे, मो. दानिश, विजय मोरे, रोहित पवार, महेश कल्याणकर, अजय मुंगल, जिलानी पटेल, मोहम्मदी पटेल इत्यादी संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Protests of Nationalist Students Congress against Arnab Goswami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.