‘कोरडे आभाळ’चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:18 AM2020-12-06T04:18:54+5:302020-12-06T04:18:54+5:30
तामसा येथे वृक्षारोपण तामसा- येथील बारालिंग मंदिर परिसरात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तामसा विकास मंचकडून गुरुवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ...
तामसा येथे वृक्षारोपण
तामसा- येथील बारालिंग मंदिर परिसरात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तामसा विकास मंचकडून गुरुवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पुजारी रेवणसिद्ध महाराज कंठाळे, सुरेश देशमुख, शुभम देशमुख आदी उपस्थित होते. सामाजिक जबाबदारी म्हणून दिव्यांगदिनी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे शुभम देशमुख यांनी सांगितले. सूत्रसंचालन देवानंद भोपळे यांनी केले. जगदीश जेगडे यांनी आभार मानले.
गाणी, मुलाखतीने रंगला दिव्यांग दिन
उमरी- तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, तळेगाव येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी पुस्तक भेट, गाणी व मुलाखतीने या कार्यक्रमात रंगत आली. कार्यक्रमास अंकुश खंडेलोटे, नंदकिशोर परळीकर, पंकज शिरभाते, पंचशील सोनकांबळे, राजपाल माथुरे, मार्तंड भुताळे, विलास कोळनूरकर, मौलाना शेख, अजमल खान आदी उपस्थित हाेते.
विद्यार्थिसंख्या वाढली
निवघा बाजार- गत आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळेची घंटा बुधवारी वाजल्यानंतर पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प होती. मात्र, गुरुवारी गंगाराम पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढली होती. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे तापमान थर्मल गनद्वारे तपासले, तसेच प्रत्येकासाठी सॅनिटायझरचा वापर बंधनकारक केला.
भोकर येथे भीमस्वरांजली कार्यक्रम
भोकर- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी शहरात विविध ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा भोकरच्या वतीने अभिवादन सभा ठेवण्यात आली असून, आंबेडकर चौकात याच दिवशी सकाळी १० वाजता भीमस्वरांजली या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गायक धम्मानंद जाधव, संकल्प जाधव, उषा गायकवाड, प्रा. राहुल कदम यांचा सहभाग राहणार आहे.
माधव नारेवाड यांची निवड
तामसा- येथील कोळी महादेव समाजाचे समन्वयक माधव नारेवाड यांची कोळी महादेव समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. सारखणी येथे आदिम विकास परिषदेचे आयोजन कोळी महादेव समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी माधव नारेवाड यांना जिल्हाध्यक्षपदी घोषित करण्यात आले.