नाटककार बादल सरकार यांच्यावरील समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:18 AM2021-03-26T04:18:08+5:302021-03-26T04:18:08+5:30
डॉ. शैलजा वाडीकर या विद्यापीठाच्या भाषा संकुलाच्या संचालिका असून, नाट्यसमीक्षक आणि लेखिका म्हणून त्या परिचित आहेत. नाटककार विजय तेंडुलकर, ...
डॉ. शैलजा वाडीकर या विद्यापीठाच्या भाषा संकुलाच्या संचालिका असून, नाट्यसमीक्षक आणि लेखिका म्हणून त्या परिचित आहेत. नाटककार विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड, मोहन राकेश यांच्या नाट्यकृतींचा अभ्यास डॉ. वाडीकर यांनी केला आहे. याच मालिकेत बादल सरकार यांच्या कार्याचाही सखोल अभ्यास त्यांनी केला आहे ‘अटलांटिक’ या ख्यातनाम प्रकाशन संस्थेने डॉ. शैलजा वाडीकर यांचा समीक्षाग्रंथ प्रकाशित केला आहे. प्रकाशनाच्यानिमित्ताने डॉ. पृथ्वीराज तौर यांनी बादल सरकार यांचे वाङ्मयीन योगदान याबाबत थोडक्यात माहिती दिली. डॉ. शैलजा वाडीकर यांनी ग्रंथनिर्मितीची पार्श्वभूमी विशद केली.
यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी ग्रंथप्रकाशनाच्या निमित्ताने लेखिकेला शुभेच्छा देत ‘माहिती तंत्रज्ञान यांचा वापर करून लेखकांनी आपले लेखन जागतिक पातळीवर उपलब्ध करून दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले. ‘बादल सरकार : पीपल्स प्लेराइट’ या ग्रंथाच्या किंडल आवृत्तीच्या निमित्ताने डॉ. केशव देशमुख, डॉ. रमेश ढगे, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. झिशान अली, डॉ. नीना गोगटे यांनी डॉ. शैलजा वाडीकर यांचे कौतुक केले.