पुणे विभागाचा मुलींचा संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:09 AM2018-11-13T00:09:26+5:302018-11-13T00:11:08+5:30

मुलींच्या गटात अंतिम सामन्यात पुणे विभागाने अमरावती विभागावर एक गोलने मात केली. मंगळवार, १३ रोजी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र फुटबॉल संघाची निवड होणार आहे.

Pune team's girls team won | पुणे विभागाचा मुलींचा संघ विजयी

पुणे विभागाचा मुलींचा संघ विजयी

Next
ठळक मुद्देसगरोळीत राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा कोल्हापूर मुलांचा संघ विजेता

सगरोळी : येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात १२ रोजी कोल्हापूर विभागाने मुंबईचा ३ विरुद्ध शून्य असा दणदणीत पराभव केला तर मुलींच्या गटात अंतिम सामन्यात पुणे विभागाने अमरावती विभागावर एक गोलने मात केली. मंगळवार, १३ रोजी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र फुटबॉल संघाची निवड होणार आहे.
क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा परिषद नांदेड, जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या वतीने रविवार, ११ पासून राज्यस्तरीय शालेय १४ वर्षांखालील मुला व मुलींच्या फुटबॉल स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी नऊ विभागांतील मुलींचे ९ व मुलांचे ९ अशा एकूण १८ संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सोमवार, १२ रोजी मुलींमध्ये कोल्हापूर विरुद्ध पुणे ही लढत झाली. यामध्ये पुणे विभागाने १ गोलने विजय मिळविला. अमरावती व मुंबई यांच्यामधील सामन्यात अमरावती विभागाने १ विरुद्ध शून्य असा विजय मिळविला. पुणे व अमरावती विभागात अंतिम सामना झाला यामध्ये पुणे विभागाने १ विरुद्ध शून्य गोलने अमरावतीचा पराभव करून राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली. अमरावती विभागास उपविजेतेपद मिळाले. तिसºया स्थानासाठी कोल्हापूर विरुद्ध मुंबई यांच्या सामन्यात मुंबईने बाजी मारली.
मुलांमध्ये कोल्हापूर विरुद्ध औरंगाबाद यांच्या लढतीत कोल्हापूर विभागाने विजय मिळविला. मुंबई व नाशिकमधील सामन्यात मुंबईने ३ विरुद्ध शून्य या फरकाने सामना जिंकला. अंतिम सामना कोल्हापूर व मुंबई या चुरशीच्या लढतीत कोल्हापूर विभागाने मुंबई विभागावर ३ विरुद्ध शून्यने मात करीत विजेतेपद पटकावले. तिसºया स्थानासाठी झालेल्या लढतीत नाशिकने औरंगाबाद विभागाचा पराभव केला.
१३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र फुटबॉल संघाची निवड होणार आहे. यासाठी खेळाडू, प्रशिक्षक व पालक यांनी सगरोळी येथे हजेरी लावली. राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघास पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, नांदेड जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव के. आर. अन्सारी, फुटबॉल निवड समितीचे अध्यक्ष धीरज मिश्रा, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी गुरुदीप सिंग, राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक वामन सर, नंदकिशोर जाधव उपस्थित होते़

Web Title: Pune team's girls team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.