पूर्णा-पटना एक्सप्रेस पूर्णा रेल्वे स्थानकावरून गुरुवारी सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:28 AM2020-12-05T04:28:02+5:302020-12-05T04:28:02+5:30

गाडी संख्या ०७६१० पूर्णा ते पटना उत्सव विशेष गाडी ४ आणि ११ डिसेंबरला पूर्णा येथून पूर्वी घोषित केल्या नुसार ...

The Purna-Patna Express will leave Purna railway station on Thursday | पूर्णा-पटना एक्सप्रेस पूर्णा रेल्वे स्थानकावरून गुरुवारी सुटणार

पूर्णा-पटना एक्सप्रेस पूर्णा रेल्वे स्थानकावरून गुरुवारी सुटणार

Next

गाडी संख्या ०७६१० पूर्णा ते पटना उत्सव विशेष गाडी ४ आणि ११ डिसेंबरला पूर्णा येथून पूर्वी घोषित केल्या नुसार त्याच तारखेला सुटेल. परंतु १८ डिसेंबर रोजी सुटणारी गाडी १७ डिसेंबर रोजी सुटेल तसेच २५ डिसेंबर रोजी सुटणारी गाडी २४ डिसेंबरला गुरुवारी सुटेल.

म्हणजेच १७ आणि २४ डिसेंबरला गुरुवारी ही गाडी पूर्णा रेल्वे स्थानकावरून दुपारी २.१० वाजता सुटेल. नांदेड- २.४२, आदिलाबाद- ६.२०, नागपूर- साडेबारा वाजता पोहचेल, पुढे पटना येथे रात्री ११.२० वाजता पोहोचेल.

गाडी संख्या ०७६०९ पटना ते पूर्णा उत्सव विशेष गाडी ६ डिसेंबर आणि १३ डिसेंबरला सुटणारी गाडी पूर्वी घोषित केल्यानुसार रविवारी पटना रेल्वे स्थानकावरून सकाळी ७ वाजता सुटेल. परंतु २० डिसेंबरला सुटणारी गाडी आता १९ डिसेंबरला आणि २७ डिसेंबरला सुटणारी गाडी २६ डिसेंबरला म्हणजे शनिवारी पटना रेल्वे स्थानकावरून सकाळी ७ वाजता सुटेल. आणि नागपूर- ४.४०, आदिलाबाद- ११.०५, नांदेड -११.४२ मार्गे पूर्णा येथे दुपारी ३.२५ वाजता पोहोचेल.

म्हणजेच १९ आणि २६ डिसेंबरला शनिवारी ही गाडी पटना रेल्वे स्थानकावरून सकाळी ७ वाजता सुटेल आणि नागपूर- ४.४० आदिलाबाद- ११.०५ , नांदेड -११.४२ मार्गे पूर्णा येथे दुपारी ३.२५ वाजता पोहोचेल.

Web Title: The Purna-Patna Express will leave Purna railway station on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.