‘पीएमजीएसवाय’च्या कामांचा दर्जा चांगला, तरीही दर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:23 AM2021-08-24T04:23:16+5:302021-08-24T04:23:16+5:30
दरातील या तफावतीमुळेच पीएमजीएसवायची कामे करायची की नाही, असा मुद्दा बांधकाम कंत्राटदारांकडून उपस्थित केला जात आहे. आंतरराज्यीय आणि लाेकलचा ...
दरातील या तफावतीमुळेच पीएमजीएसवायची कामे करायची की नाही, असा मुद्दा बांधकाम कंत्राटदारांकडून उपस्थित केला जात आहे.
आंतरराज्यीय आणि लाेकलचा फरक
प्रधानमंत्री ग्राम सडक याेजनेचे दर ठरविताना आंतरराज्यीय दराचा विचार केला जाताे. याउलट पीडब्ल्यूडीचे दर ठरविताना केवळ महाराष्ट्राचा विचार करण्यात येताे. पीडब्ल्यूडीसाठी त्यांच्याच अधिनस्थ गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत आहे. त्यामुळे हा विभाग आपल्याच सहकाऱ्यांच्या देखरेखीतील कामांच्या गुणवत्तेवर किती प्रामाणिकपणे बाेट ठेवेल, याबाबत शंका व्यक्त केली जाते. या विभागाने प्रामाणिकपणे व तटस्थतेने आपले काम केले असते तर रस्त्यांची वाताहत झाली नसती व जनतेला ओरड करण्याची संधी मिळाली नसती, असेही सांगितले जाते.
चाैकट....
पीएमजीएसवायमध्ये आंतरराज्यीय पथक
पीएमजीएसवायमध्ये कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी एसक्यूएम आणि एसएसक्यूएम ही यंत्रणा आहे. यात काेणत्याही जिल्ह्यातील व राज्यातील अधिकारी बांधकामाच्या तपासणीसाठी केव्हाही येऊ शकताे व ताे काेणत्याही ठिकाणच्या कामाची तपासणी करू शकताे. या यंत्रणेमुळेच पीएमजीएसवायमध्ये कामांचा दर्जा राखला जाताे.
काेट
गेल्या चार वर्षांपासून नवे दर ठरविले गेले नाहीत. दरांमध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळेच कंत्राटदारांनी बांधकामांवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे. थकीत देयके हेसुद्धा त्यामागे एक प्रमुख कारण आहे.
- एम. ए. हकीम,
महासचिव,
महाराष्ट्र इंजिनिअर्स असाेसिएशन