पाणीपाळ्याचा प्रश्न पुन्हा पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:12 AM2017-12-06T01:12:30+5:302017-12-06T01:12:39+5:30
नांदेड : रबी हंगाम संपत आला तरी अद्यापही विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीला आवर्तन सोडण्यात आले नाही़ त्यामुळे केवळ घोषणा करण्याºया दोन्ही आमदारांवर आता जनतेचा विश्वास राहिला नसल्याची टीका करीत येत्या ७ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धोंडगे यांनी दिला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : रबी हंगाम संपत आला तरी अद्यापही विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीला आवर्तन सोडण्यात आले नाही़ त्यामुळे केवळ घोषणा करण्याºया दोन्ही आमदारांवर आता जनतेचा विश्वास राहिला नसल्याची टीका करीत येत्या ७ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धोंडगे यांनी दिला आहे़
लिंबोटी आणि विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी आ़शंकर धोंडगे यांनी पाटबंधारे कार्यालयात धरणे आंदोलन केले होते़ त्यावेळी आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही केवळ स्टंटबाजी असून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता़ तसेच येत्या काही दिवसांत पाणीपाळ्या सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते़, परंतु अद्यापपर्यंत विष्णूपुरीतून पाणीपाळ्या सोडण्यात आल्या नाहीत़ त्यात आता रबी हंगामही संपत आला आहे़ विशेष म्हणजे, यंदा विष्णूपुरी प्रकल्प १०० टक्के भरला आहे़
अत्यल्प पाऊस झालेल्या लोहा तालुक्याचे दोन आमदार प्रतिनिधित्व करतात़ विष्णूपुरी प्रकल्पाअंतर्गत कालव्याद्वारे रबी हंगामासाठी १० हजार हेक्टर आसपास क्षेत्र असून ४० ते ५० गावांचा समावेश आहे़ चालू वर्षात लोहा-कंधार क्षेत्रातही पाऊस सरासरीच्या ५५ टक्के झाला आहे़ खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग हातून गेले आहे़ कापसावर गुलाबीअळीचा प्रादुर्भाव आहे़
बोंडअळीने बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळवून देण्यातही मदत करण्यात येत नाही़ विष्णूपुरीतून १५ आॅक्टोबरलाच आवर्तन सुरु केले असते तर शेतकºयांना लाभ मिळाला असता़, परंतु आता दोन महिने विलंब झाल्यामुळे रबीची आशा मावळली आहे, अशी टीका धोंडगे यांनी केली़ तसेच या विरोधात ७ डिसेंबर रोजी पाटबंधारे कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे़
दरम्यान, आ़हेमंत पाटील यांनी सोनखेड येथील आढावा बैठकीत विष्णूपुरीतून तीन आवर्तने मंजूर केल्याचे व जायकवाडीतील ६० दलघमी पाणी विष्णूपुरीसाठी आरक्षित केल्याचे सांगितले़ विष्णूपुरीतून मिळणाºया पाणी पाळ्यावरुन सध्या लोहा-कंधार तालुक्याचे राजकारण चांगलेच तापले आहे़ आगामी काळात या विषयावरुन सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार हे मात्र नक्की़ मात्र या वादात शेतकºयांच्या हातून मात्र रबी हंगाम जाणार हे निश्चित़