देगलूरमधील दोन मतदान केंद्रांवर सहा वाजल्यानंतरही शेकडो मतदारांच्या रांगा, यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 07:20 PM2024-11-20T19:20:38+5:302024-11-20T19:20:46+5:30

शहरातील साधना हायस्कूल येथील दोन मतदान केंद्रांमध्ये मतदारांच्या रांगा होत्या

Queues of hundreds of voters at two polling stations in Deglur even after six o'clock; The process will continue for another hour and a half | देगलूरमधील दोन मतदान केंद्रांवर सहा वाजल्यानंतरही शेकडो मतदारांच्या रांगा, यंत्रणा सज्ज

देगलूरमधील दोन मतदान केंद्रांवर सहा वाजल्यानंतरही शेकडो मतदारांच्या रांगा, यंत्रणा सज्ज

-शेख शब्बीर
देगलूर:
 नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व देगलूर विधानसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या मतदानासाठी  देगलूर शहरातील केंद्र क्रमांक 209 व 210 या ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या ठिकाणी सायंकाळी सहा वाजेच्यानंतरही मतदान प्रक्रिया चालू असून प्रशासनातर्फे उर्वरित मतदारांना जवळपास दीडशे टोकन देण्यात आले आणि मतदानाचा अवधी अडीच ते तीन तास वाढवून देण्यात आल्याचे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.

देगलूर विधानसभा मतदारसंघात 312,237 मतदार आहेत. दरम्यान, शहरातील साधना हायस्कूल येथील केंद्र क्रमांक 209 व केंद्र क्रमांक 210 या ठिकाणी सायंकाळी सहा वाजेच्या नंतरही मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. वेळ संपल्यानंतरी केंद्रांवर महिला व पुरुष मतदारांची मोठी गर्दी होती. यंत्रणेने जवळपास 150 मतदारांना मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी टोकन दिले. 

दरम्यान, सहा वाजेनंतरही मतदानाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास दोन ते अडीच तासाचा वेळ लागणार असल्याचा अंदाज निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. शेकडो मतदार प्रतीक्षेत असल्याने निवडणूक विभागासह पोलीस प्रशासन केंद्रावर सज्ज असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.

Web Title: Queues of hundreds of voters at two polling stations in Deglur even after six o'clock; The process will continue for another hour and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.