जातीय विद्वेष आंतरजातीय विवाहाने कमी होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:31 AM2021-03-04T04:31:39+5:302021-03-04T04:31:39+5:30
शिवणी येथे किरकोळ कारणावरून दलित समाजाच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. या कुटुंबाचे आठवले यांनी सांत्वन केले. तसेच ...
शिवणी येथे किरकोळ कारणावरून दलित समाजाच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. या कुटुंबाचे आठवले यांनी सांत्वन केले. तसेच एक लाख रुपयांचा धनादेश दिला. या कुटुंबाला आणखी चार लाख रुपये मिळणार आहेत. यावेळी आठवले म्हणाले, पोलिसांनी या प्रकरणात चांगली कारवाई केली. नऊपैकी आठ आरोपींना अटक केली आहे. एका घटनेमुळे गावाशी वितुष्ट करण्याचा आमचा हेतू नाही. परंतु, सर्वांनीच अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनीही दलित समाजाला संरक्षण देण्याची गरज आहे. बाळासाहेबांचे स्वप्न होते शिवशक्ती-भीमशक्तीचे. त्यामुळे एकमेकांवर हल्ले करू नका. असे आवाहनही आठवले यांनी केले. राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत काळजी व्यक्त करताना ते म्हणाले, देशभरातील पन्नास टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आढळत आहेत. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
चौकट-
साहित्य असल्याशिवाय मजुरांना ड्रेनेजमध्ये उतरू देऊ नका
सुरक्षेचे कोणतेही साधन नसताना मजुरांना ड्रेनेजमध्ये उतरून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. संरक्षक साहित्य असल्याशिवाय त्यांना हे काम देऊच नका. उलट मजुरांना ड्रेनेजमध्ये उतरविण्यापेक्षा मशीनचा वापर करा. जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे की, मशीनसाठी ८० लाख रुपये ठेवले आहेत. त्या लवकर खरेदी करा. महापालिकेत २ हजार २५४ सफाई कामगार मंजूर आहेत. प्रत्यक्षात १ हजार ५२४ पदे भरली आहेत. उर्वरित पदे लवकर भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.