नांदेड शहरात बसणार रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर; महावितरण ९८ हजार वीजमीटर बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 07:19 PM2019-04-30T19:19:30+5:302019-04-30T19:20:23+5:30

आरएफ तंत्रज्ञानामुळे मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या मीटर रीडिंंगमधील चुका आता शंभर टक्के टाळता येणार आहेत.

Radio Frequency Meter in Nanded City; Mahavitaran will change 98 thousand meter | नांदेड शहरात बसणार रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर; महावितरण ९८ हजार वीजमीटर बदलणार

नांदेड शहरात बसणार रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर; महावितरण ९८ हजार वीजमीटर बदलणार

googlenewsNext

नांदेड : अचूक मीटर वाचन व्हावे या उद्देशाने मानवी हस्तक्षेप टाळत महावितरणने अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ या निर्णयाची नांदेड शहरात अंमलबजावणी सुरू झाली असून जवळपास ९८ हजार मीटर बदलून नवे मीटर बसविण्यात येणार आहेत. 

आमचे मीटर रीडिंगच घेतले नाही? अ‍ॅव्हरेज रीडिंगचे वीजबिल दिले जाते अशा प्रकारच्या तक्रारीला आता रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे वाव राहणार नाही. कारण आरएफ मीटरमुळे मीटर रीडिंगमध्ये होणारा मानवी हस्तक्षेप आता पूर्णपणे नाहीसा होणार आहे.  

ज्याप्रमाणे रेडिओची फ्रिक्वेन्सी सेट करुन प्रसारण केले जाते, त्याप्रमाणे पंधरा ते वीस मीटरच्या परिघातील आरएफ मीटरचे रीडिंग एकाच वेळी आपोआप घेतले जाऊन तो सर्व डाटा महावितरणच्या सर्व्हरमध्ये पोहोचवला जातो व त्यानंतर सर्व बिले तयार करुन वीजग्राहकांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरु केली जाते. आरएफ तंत्रज्ञानामुळे मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या मीटर रीडिंंगमधील चुका आता शंभर टक्के टाळता येणार आहेत.  वीजग्राहकाने जेवढ्या युनिटचा वापर केला आहे तेवढ्याच युनिटची आरएफ तंत्रज्ञानामुळे थेट महावितरणच्या प्रणालीमध्ये नोंद होऊन वीजग्राहकाला अचूक वीजबिल दिले जाईल. वीजग्राहकाने वीज मीटरमध्ये छेडछाड केल्यास त्याची नोंदही वीजमीटरमध्ये घेतली जाणार असल्यामुळे वीजचोरीस आळा बसणार आहे. परिणामी, वीजगळतीचे प्रमाणही कमी होणार आहे.
ग्राहकांनी सहकार्य करा - वहाणे
नांदेड शहरामध्ये सिंगलफेज मीटर असलेल्या ९८ हजार वीजग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत. त्या ठिकाणी नवीन मीटर बसविण्यात येणार आहे़ ग्राहकांनी या बदलाची नोंद घेऊन वीजमीटर बदलण्यास महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी केले आहे.

Web Title: Radio Frequency Meter in Nanded City; Mahavitaran will change 98 thousand meter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.