नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 04:44 AM2020-03-05T04:44:49+5:302020-03-05T04:45:01+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात सिनिअर विद्यार्थिनीकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची रॅगिंग केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात सिनिअर विद्यार्थिनीकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची रॅगिंग केली जात असल्याचे उघडकीस आले आहे़ स्रेहसंमेलनाची तयारी आटोपल्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंत प्रथम वर्षांच्या मुलींना वसतिगृहात उभे राहण्यास सांगण्यात येत आहे़ गेल्या चार दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे़ परंतु याबाबत कुठलीही तक्रार आली नसल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे़
येत्या काही दिवसात महाविद्यालया स्रेहसंमेलन घेण्यात येणार आहे़ त्यासाठी ग्रंथालयाच्या वरच्या मजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी तयारी करीत आहेत़ रात्री अकरा वाजेनंतर ते सर्व जण आपआपल्या वसतिगृहात परत जातात़ परंतु गेल्या चार दिवसांपासून वसतिगृहात प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनींना रात्री तीन वाजेपर्यंत उभे करुन ठेवण्यात येत आहे़ अशी माहिती हाती आली आहे़
>प्रकरणाची चौकशी
वसतिगृहात असा काही प्रकार होत असेल असे वाटत नाही़ तरीही मुलींशी बोलून चौकशी करणार आहे़
- डॉ़एस़आऱवाकोडे,
प्रभारी अधिष्ठाता